गाव तेथे मतदान केंद्र अशी भूमिका निवडणूक आयोगाची आहे. पवनारखारी, गणेशपूर, चांदमारा ही गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या सात किलोमीटर अंतरावर विस्तार आहे. निवडणूक विभागाने तिन्ही गावांमध्ये मतदान केंद्र दिले आहेत. परंतु गणेशपूर येथील २०० ते २५० मतदारांना चांदमारा येथील मतदान केंद्राला जोडले आहे. सदर ग्रामपंचायत जुनी असून मतदारांचे समसमान वाटपाकरिता नियोजन केले होते. सध्या लोकसंख्येत वाढ झाल्याने मतदारांची संख्या वाढली. त्यामुळे गणेशपूर येथील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक विभागाने मतदार यादी व मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करताना यावर मतदारांनी आक्षेप घेण्याची गरज होती, परंतु ती घेण्यात न आल्याने गणेशपूर येथील मतदारांचा समावेश चांदमारा येथे करण्यात आला. परंतु सर्वसामान्य मतदारांना सात किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. चांदमारा या गावाला जाताना बाळापूर व डोंगरी बुजरुक गाव ओलांडून जावे लागणार आहे.
कोट
पवनारखारी,गणेशपूर, चांदमारा गट ग्रामपंचायतीसाठी मतदान केंद्र निश्चित केल्यानंतर यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु त्यावर आक्षेप न घेतल्याने मतदान केंद्रनिहाय मतदारांचा समावेश करण्यात आला.
बाळासाहेब तेळे तहसीलदार, तुमसर