आॅनलाईन लोकमतपालांदूर चौ. : चुलबंध नदीखोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळाले आहे. पाणी टंचाईचा हिशेब करता श्ोतकºयांना शक्य तितक्या बांध्यात धान लावगडीचा निर्णय घेतला आहे.पालांदूर, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, वाकल, पाथरी, खराशी, खुनारी, लोहारा, नरव्हा, दिघोरी परिसरात उन्हाळी धानाचा हंगाम जोरात आला आहे. यामुळे रोवणीकरिता महिला मजुरांची तीव्र टंचाई या भागात जाणवत आहे. किमान २० दिवस हा हंगाम राहणार असून शेतकऱ्यांचा अख्खा कुटूंब शेतात खपत आहे. स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून शेतकरी किमान २ एकरापर्यंत उन्हाळी धान लावण्याचा नियोजन करतो. मात्र भूजलटंचाई व वीज समस्येचा विचार करता या वर्षाला केवळ १ ते दीड एकरातच धानाचा हंगाम धरला आहे. रोवणीचा दर पर एकराला दोन हजार दोनशे रुपये एवढा निश्चीत झाला असून मजुरी पध्दतीने दिवसाला ११० रुपये एवढा दर महिलांकरिता दिला जात आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरु असून ९० टक्के शेती आजही ट्रॅक्टरच्या आधाराने कसली जात आहे. ट्रॅक्टर शेतीला वरदानच ठरले आहे. झटपटच्या काळात वेळेची व पैश्याची बचत ट्रॅक्टरमुळे शक्य झाले आहे.गोसेखुर्द ने हरितक्रांती येईल हे एक दिवास्वप्नच ठरत आहे. धान लागवड कमी करण्याकरिता मंडळकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना प्रामाणिकतेने प्रयत्न करीत हरभºयाचे क्षेत्रफळ सुमार वाढविले आहे. भाजीपाल्याचे सुध्दा क्षेत्र वाढले आहे.प्रशासनाच्या हाकेला साथ देत धानपीक कमी केले आहे. भाजीपाला लागवड केली असून बाजारभाव कोसळल्याने भाजीपाल्याची शेती नकोशी झाली आहे. रात्रंदिवस श्रम उपसत भाजीपाला उत्पादीत केला. मात्र भावच नसल्याने लागलेले पैसेही निघत नसल्याने नाईलाजाने धानच बरे म्हणावे लागते.- क्रिष्णा देशमुख, पालांदूर चौ.शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा बारमाही अभ्यास ठेऊनच भाजीपाल घ्यावा. गटागटाने एकत्रीत एका-एकाने वेगवेगळे पीक घ्यावे. एकच पिक अधिक क्षेत्रात लावण्यापेक्षा दोन तीन पिक /भाजीपाला घ्यावा. यामुळे निश्चितपणे इथून नाही तर तिथून पैसे येणारच.- पी.पी. गिदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनीपाणी ही राष्टÑीय संपत्ती आहे. तिचा सदुपयोग व्हावा याकरिता कमी पावसात व्यवस्थीत सिंचन व्हावे याकरिता ढिंबक चा वापर करुन धानाऐवजी इतरपिके बाजारपेठेच्या अभ्यासाने उत्पादीत करावी.- मंगेश घोळके, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर चौ.
हजारो एकरात उन्हाळी धान रोवणीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:27 PM
चुलबंध नदीखोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळाले आहे. पाणी टंचाईचा हिशेब करता श्ोतकऱ्यांना शक्य तितक्या बांध्यात धान लावगडीचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देहजारो एकरात रोवणी : मजूरटंचाईचा सामना