शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 12:16 PM

Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : मागील जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आहे. नुकसानभरपाई उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविले आहे. 

मागील २० ते २२ जुलै रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपून काढले होते. या अतिवृष्टीने तालुक्यातील तब्बल ८ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील १७ हजार १०८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तर ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८५३ शेतकऱ्यांचे ३०८ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले आहे. 

या दोन्हीप्रकरणी स्थानिक लाखांदूर तहसील प्रशासनांतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्याची कारवाई होऊन जवळपास २ महिने लोटूनदेखील अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई उपलब्ध केली नाही. अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नरेश दिवठे, तालुका महासचिव गोविंदराव बरडे, दीपक चिमणकर, देवानंद नागदेवे, लोचन पारधी, दादा अलोणे, कारू भावे, ब्रह्मदास मेश्राम, राष्ट्रपाल लोणारे, खुशाबा गजभिये, अनिल पारधी, उमेश वनस्कर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती