लोकमत न्यूज नेटवर्ककरडी(पालोरा) : धानाची कापणी व मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी करडी, पालोरा, मुंढरी धान खरेदी केंद्रावर धान आणून ठेवले आहेत. परंतू पर्याप्त गोडाऊन अभावी हजारों क्विंटल धान्य केंद्रावर पडून आहेत. अजुनही धानाचा काटा सुरू झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. धानाची मोजणी झालेली नसल्याने दैनदिन खर्च, मुला-मुलीचा लग्न व अन्य खर्चासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गतवर्षी शेतकऱ्यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतू यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शासनाच्या निर्देशानुसार धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीकरीता डीजिटल सातबाराची अट समोर केली. अनेक शेतकऱ्यांना वेळेत डिजीटल सातबारा तयार मिळाला नाही.त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू होवूनही १५ दिवस बंद राहीले. धानाचा काटाही करण्यात आलेला नव्हता. शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. डिजिटल सातबारा अट रद्द करून तलाठी सातबारावर धान खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी करडीचे सरपंच महेंद्र शेडे यांनी रस्ता रोको आंदोलन उभारला होता. अखेर शासन-प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत तलाठी सातबारावर जुन्याच पद्धतीने धान खरेदी करण्यास परवानगी दिल्याने धान खरेदी सुरू करण्यात आली. परंतू ग्रामीण भागात उपलब्ध गोडावूनची क्षमता अत्यंत तोकडी असल्याने अल्पावधीत गोडावून भरले. त्यामुळे पुन्हा धानाचा काटे बंद करण्यात आले. शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी ओरड वाढताच प्रशासनाने खरेदी केंद्र सुरू करून बाहेर धानाचा काटा केले जाईल व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. परंतू गोडाऊनच नसल्यान खरेदी यंत्रणा बंद पडली आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष तेवुन गोडावूनची व्यवस्था करून देण्याची मागणी करडी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे. जर गोडावूनची व्यवस्था होवून तात्काळ धानाचे काटे सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असाही ईशारा महेंद्र शेंडे यांनी दिला आहे.
गोडाऊनअभावी हजारो क्विंटल धान केंद्रावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 5:00 AM
गतवर्षी शेतकऱ्यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतू यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शासनाच्या निर्देशानुसार धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीकरीता डीजिटल सातबाराची अट समोर केली. अनेक शेतकऱ्यांना वेळेत डिजीटल सातबारा तयार मिळाला नाही.
ठळक मुद्देपर्याप्त गोडावूनची व्यवस्था करा : धानाचे काटे केव्हा होणार, शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा