मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. लॉकडाऊनच्या काळात हा धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. मात्र जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी केवळ एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असल्याने हजारो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा खासगी व्यापारी घेत असून ३०० ते ४०० रुपए प्रती क्विंटल घाटा सहन करून धान विकत आहेत.भंडारा जिल्ह्यात खरीपानंतर उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता हा उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. शेकडो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरी येत आहे. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा काळात दोन पैसे मिळविण्यासाठी शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहे. मात्र खरेदी केंद्राअभावी धान विकण्यास अडचणी निर्माण होत आहे.उन्हाळी धानाची आधारभूत खेरेदी १ मे पासून करण्याचे आदेश आहे. साकोली तालुक्यातील सानगडी येथील एकमेव आधार केंद्र सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दुसरीकडे धान खरेदीही प्रभावित झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना आपला धान विकत आहे. व्यापारी या शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रुपए कमीने धान खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.लाखनी तालुक्यात १९८२ हेक्टवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. त्यात चुलबंध खोऱ्यात ९८१ हेक्टर धानाचा समावेश आहे. आता १५ मे उजाडला तरी धान खरेदी सुरू झाली नाही. खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने आजही तो शासकीय गोदामात पडून आहे. आणि हिच खरी अडचण उन्हाळी धान खरेदीसाठी आहे.भरडाई झालेल्या तांदळाची उचलच नाहीखरीप हंगामात जिल्ह्यात ३२ लाख १० हजार क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. आतापर्यंत १९ लाख क्विंटल धानाची भरडाई आटोपली असून १३ लाख क्विंटल धानाची भरडाई व्हायची आहे. गोदाम व्यवस्था तोकडी असल्याने उन्हाळी धान खरेदीसाठी खरी अडचण येत आहे. पालांदूर येथील सोसायटीचे अध्यक्ष विजय कापसे म्हणाले, पालांदूर केंद्राकडे ४० हजार क्विंटल धान शिल्लक आहे. गोदाम भरलेले आहेत. खुल्या पटांगणात १० हजार क्विंटल धान पडून आहे. त्यामुळे उन्हाळी धान खरेदीस विलंब होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.गोदाम व्यवस्था अपुरी असल्याने उन्हाळी धान हंगामाला विलंब होत आहे. मात्र येत्या एक दोन दिवसात धान खरेदी निश्चित सुरू करण्यात येईल.
भंडारा जिल्ह्यात हजारो क्विंटल उन्हाळी धान मोजणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 1:14 PM
भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. लॉकडाऊनच्या काळात हा धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. मात्र जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी केवळ एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असल्याने हजारो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात एकच केंद्र सुरू अवकाळी पावसाची टांगती तलवार