इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : विश्वाला ‘शद्धा’ व ‘सबुरीचा’ संदेश देणाºया तथा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री साई बाबांच्या चरण पादुकांचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. श्री साई भक्तांसाठी पादुकांचे दर्शन म्हणजे भक्ती व आनंदाचे पर्वणीच ठरली.रविवारी सकाळच्या सुमारास श्री साईबाबा संस्थान शिर्डीहून श्रीसाईच्या पादुका दर्शनासाठी श्री साई संस्थान मंदिर कारधा येथे आणण्यात आले. काचेच्या पेटीत ठेवलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांग लावली होती. यावेळी श्री सार्इंची महाआरती करण्यात आली. यानंतर पालखी मिरवणूकीतून सदर पादुका शास्त्री चौक स्थित दसरा मैदानात श्री साई समाधी सोहळा परिसरात नेण्यात आल्या. साई नामाच्या जयघोषाने भंडाºयात शिर्डी अवतरल्याचा भास झाला.श्री साई समाधी शताब्दी भंडारा उत्सव समितीच्या वतीने २५ ते ३१ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सार्इंची भव्य व आकर्षक मूर्ती सोहळ्याचे आकर्षण ठरत आहे.रविवारी दसरा मैदानात भजन किर्तन व सायंकाळी ७ वाजता महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई समाधी शताब्दी भंडारा उत्सव समितीने केले आहे.
श्री साई पादुकांचे हजारोंनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:18 PM
विश्वाला ‘शद्धा’ व ‘सबुरीचा’ संदेश देणाºया तथा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री साई बाबांच्या चरण पादुकांचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
ठळक मुद्देपालखी मिरवणूक : साई नामाच्या जयघोषाने दुुमदुमली नगरी