लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे. ऋषीपंचमीला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून महिला पवित्र स्नान करून पूजा करीत असतात. यावर्षी सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंत हजारो महिलांनी ऋषीपंचमीनिमित पवित्र स्नान केले.भाद्रपद महिन्यातील पंचमीला दरवर्षी हे व्रत केल्या जाते. रजोनिवृत्त झालेल्या महिला या व्रतासाठी हजेरी लावतात. व्रतस्थ महिलांनी नदीवर जावून आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठाने दंतधावन करावे, आवळकाठी व तिष्ठ वाटून स्रान करून वस्त्र परिधान करावे. अरुंधतीसह सात ऋषींची पूजा करावी, असे हे व्रत असून बैलांच्या परिश्रमाशिवाय उत्पादीत धान्य व पालेभाज्यांचा स्वयंपाक येथे केला जातो.यात प्रामुख्याने देवतांदळाचा समावेश असतो. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातून पवित्र वैनगंगा नदीकाठावरील वैजेश्वर मंदिर व घाटावर दुपारपर्यंत हजारो महिलांनी पवित्र स्नानासाठी हजेरी लावली होती.वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. परिणामी सुरक्षेसाठी सुचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनिल ताजणे यांनी चोख बंदोबस्त लावला होता.श्रीक्षेत्र वैजेश्वर देवस्थान पंचकमेटीतर्फे महिला भाविकांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी छावणी उभारण्यात आली होती. याशिवाय रुग्णसेवा अंतर्गत पवनी ग्रामीण रुग्णालयाचे पथक कार्यरत करण्यात आले होते.यावेळी सेवाभावी संस्था व व्यक्तींनी प्रसादाचे वितरण केले. नगरपालिकेने पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात आले होते. ऋषीपंचमीचा हा सोहळा पूर्व विदर्भात प्रसिध्द आहे.
हजारो महिलांनी केले पवित्र स्रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:20 AM
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे.
ठळक मुद्देवैजेश्वर घाट : भाविकासांठी उपलब्ध केल्या सुविधा