शहरं
Join us  
Trending Stories
1
तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय; लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल
3
समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत
4
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर ७ नक्षल्यांचा खात्मा; एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसाठा जप्त
5
आंध्रात वक्फ मंडळ बरखास्त; मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार
6
आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’!
7
ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल; निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते आमिष
8
मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’; महिला ठार, चालक फरार, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू
9
पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप
10
हिंसाचारग्रस्त संभलमध्ये न्यायालयीन आयाेग दाखल; चौकशी सुरू; सर्वेक्षणादरम्यान झाली होती दंगल
11
आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा
12
पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा
13
उत्तरेत थंडी कायम, राजस्थान गारठले; अनेक राज्यांत लाट कायम, पारा घसरला
14
सिव्हिलमध्ये एकाच दिवशी 100 बालकांवर शस्त्रक्रिया; हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ यांचा समावेश
15
‘फेंगल’मुळे उडाली धांदल, पुदुच्चेरीत काेसळला २४ तासांत तब्बल ४६ सेंमी पाऊस
16
‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय
17
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग
18
सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट
19
गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार
20
दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा

घनकचऱ्याच्या विळख्यात ठाणाआरोग्य धोक्यात

By admin | Published: September 10, 2015 12:24 AM

सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये घनकचरा साचल्याने व नाल्यालगत झाडी झुडपी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

घनकचऱ्याच्या विळख्यात ठाणाआरोग्य धोक्यात : अंगणवाडीत विद्युत पुरवठा नाही, वॉर्ड क्रमांक चारमध्ये समस्याच समस्याजवाहरनगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये घनकचरा साचल्याने व नाल्यालगत झाडी झुडपी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे.भंडारा तालुक्यातील अधिक उत्पन्न मिळविणारी व नगरपंचायतीकडे वाटचाल करणारी दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप ही होय. येथे ग्रामविकास अधिकारी नियमित नसल्याने विकासाची कामे खुंटलेली आहे. येथील महात्मा गांधी वॉर्ड क्रमांक चारमध्ये तीन सदस्य आहेत. पैकी एक उपसरपंच भूषविणारा विद्यमान सदस्य आहे. तीनही सदस्य हे सत्तापक्षाचे मानले जात होते. मात्र मध्यंतरी काम करणाऱ्या शैलीवरून सत्ता पक्षात मतभेद उफाळून आले. परिणामी वॉर्डाचा विकास मंदगतीने सुरु आहे. यात इसराईल शेख ते टी.बी. उके यांच्या घरादरम्यान सांडपाणी वाहून जाणारी नालीमध्ये घनकचरा साचलेला आहे. या नालीलगत हिरवीगार झाडीझुडपी फोफावत आहे. या ठिकाणामागे विद्यमान उपसरपंच राहत आहेत. रोज ते या मार्गाने ये जा करीत असतात. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात पडत नाही ही खेदाची बाब समजावी असा प्रश्न वॉर्डातील जनता करीत आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरालगत जिल्हा परिषद शाळा आहे. येथील मोठे वृक्ष तुटून पडलेले आहे. लहान मुलांना व नागरिकांना या झाडापासून धोका होऊ शकतो. हे हटविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच ठिकाणी अंगणवाडी आहे. लहान मुलांसाठी पंख्याची सोय व्हावी या हेतूने ठराव घेण्यात आला. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. येथील मुले विना विद्युत प्रवाहाच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. गरोदर माता लहान बालके दैनिक तपासणीकरिता आले असता खोलीतील गरमीमुळे रडकुंडीला येतात. या समस्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अंगणवाडीत विद्युत पुरवठा देण्याची गरज आहे. (वार्ताहर)