शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

सिनेस्टाईल पाठलाग करुन ग्रामस्थांनी पकडले तीन आरोपी

By admin | Published: August 01, 2015 12:09 AM

टी.व्ही.चे प्रसारण सुरु असतांनी केबल कापून नेणाऱ्या एका टोळीला गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले.

डोंगरला शिवारातील घटना : केबल चोरांची टोळीचा संशयतुमसर : टी.व्ही.चे प्रसारण सुरु असतांनी केबल कापून नेणाऱ्या एका टोळीला गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डोंगरला शिवारात ही घटना घडली. तुमसर पोलिसांनी नाकाबंदी करून तिघांना अटक केली.डोंगरला येथील विनोद बनकर यांचा केबल नेटवर्कचा व्यवसाय आहे. तुमसवरुन डोंगरला व त्यापुढील गावात केबल नेटवर्कींग आहे. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बनकर यांना एका ग्राहकाने भ्रमणध्वनीवर अचानक केबलचे प्रक्षेपण का बंद झाले अशी विचारणा केली. बनकर यांनी केबल प्रसारण सुरु आहे. तांत्रिक बिघाड झाले काय बघतो असे बोलून बनकर घराबाहेर सितेपार-डोंगरला शिवाराकडे निघाले. डोंगरला शिवारात रस्त्यालगत केबल तुटलेले दिसले. पुढे सितेपार गावाच्या फाट्यावर तीन युवक एक मोटारसायकल घेऊन उभे होते. बनकर यांनी तिघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बनकर यांनी मित्रांना मदतीसाठी बोलाविल्याची चाहूल लागताच तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी सिनेस्टॉईल पाठलाग करुन त्यांना पकडले.यात आरोपी प्रितेश प्रेमदास धारगावे (२४) रा. शास्त्रीनगर भंडारा, गौरव सुनील भांडारकर (२५) लाल बहादूर शास्त्र वॉर्ड भंडारा व नबील इरशाद कुरैशी (२२) अंसारी वॉर्ड, भंडारा यांचा समावेश आहे. आरोपीकडून थ्रीकोअरचा १०० मीटर केबल, तथा केबल कापणारे कटर तुमसर पोलिंसानी हस्तगत केले. आरोपींवर ३७९ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.केबल तथा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय असून भंडारा येथून तुमसर परिसरात हे तिघेही आले होते. येथे चोरीचे रॅकेट असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी लोकमतला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)