शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:04 PM

जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात धारदार शस्त्रांनी मुकेश भिमराव भैसारे या ३६ वर्षीय तरूणाचा शुक्रवारला रात्रीच्या सुमारास बेला येथे खून केला होता.

ठळक मुद्देमुकेश भैसारे खूनप्रकरण : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात धारदार शस्त्रांनी मुकेश भिमराव भैसारे या ३६ वर्षीय तरूणाचा शुक्रवारला रात्रीच्या सुमारास बेला येथे खून केला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना भंडारा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली.अभिजीत केवल कोचे (२७) रा.मंगल पांडे वॉर्ड गणेशपूर भंडारा, सौरभ कवळू तांडेकर (१९) रा.शहापूर, व अमित राजकुमार गजभिये (२०) रा.शहापूर अशी आरोपींची नावे आहेत. भंडारा येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डातील रहिवाशी असलेला मुकेश भैसारे हा बेला येथे एका दुकानात काम करतो. यापूर्वी आरोपी आणि मुुकेश यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी भंडारा पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. या प्रकरणाची न्यायालयात अंतिम टप्प्यात सुनावणी असून आरोपी अभिजीत कोचे याने मुकेशला माघार घेण्यासाठी सांगितले. परंतु मुकेशने न एैकल्यामुळे वाद वाढत राहिला. अशातच त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार घुसर यांनी त्यांचे पथकासह मोर्चेबांधणी करून व गुप्तचर यंत्रणा सक्रीय केले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारावर अवघ्या चार तासात नागपूर जिल्ह्यातील खात येथे धाड घालून अटक केली. अटकेनंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, प्रीतीलाल रहांगडाले, साकुरे, बोरकर, मोहरकर, मडामे, दिनेंद्र आंबेडारे, अतकरी, कडव, कडव, बोंदरे, वालदे, गजभिये, पोटे, चालक रामटेके यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन चेके हे करीत आहेत.