पाणी व चाऱ्याच्या शोधात सात ते आठ वर्ष वयोगटातील अस्वल लाखनी तालुक्यात शिरले. या अस्वलाने तिघांवर हल्ला करून वैनगंगा नदीपात्रातून ब्रह्मपुरी शेतशिवाराकडे पळ काढला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित, गस्तीपथक वनपाल के. आर. पिल्लेवान, वनरक्षक जी. डी. हाते, एस. जी. खंडागळे, वनमजूर पांडुरंग दिघोरी, हरिश्चंद्र समरीत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
बॉक्स
दहा हजारांची तत्काळ मदत
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना वनविभागाच्या वतीने तत्काळ दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. सध्या तिघांचीही प्रकृती स्थिर असून, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांनी तत्काळ ही मदत जखमींच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचविली.