भंडारा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या बावनथडी नदीच्या पुलावरून तीन फुट पाणी वाहात असल्याने हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतापासून हा मार्ग बंद पडल्याने या मार्गवरील दळणवळण ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील बावनथडी नदीवर बपेरा (ता. तुमसर) या गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर हा मोठा पूल आहे. दोन दिवसांपासून दोन्ही राज्यांच्या सिमावर्ती भागात पाऊस सुरू असल्याने नदीला पूर आला. परिणामत: शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतापासून पुलावरून पाणी वाहायला लागल्याने मार्ग बंद पडला.
सकाळी ११ वाजता पुलावरून तीन फुट पाणी वाहात होते. यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.