चूलबंद खोऱ्यात तीन किलोमीटरचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. शेतकऱ्यांना या रस्त्याशिवाय दुसरा रस्ता नसल्याने सगळ्यांची नाळ या रस्त्याने बांधली आहे. वर्षभर याच रस्त्याने भाजीपाल्याची वाहतूक होते. पावसाळ्याच्या दिवसांत तर पायी चालणे समस्याग्रस्त आहे.
या रस्त्याच्या बांधकामासंबंधाने माजी सरपंच श्यामा बेंदवार यांनी बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत. मात्र, अजूनपर्यंत या रस्त्यावर बांधकाम केले नाही. जनमान्य या रस्त्याच्या अवकळेने त्रासलेली आहेत. संपूर्ण रस्ताच खड्ड्याच्या आश्रित झाल्याने वाहन कोठून काढावे? हा प्रश्न पडतो. फूट दोन फूट खोल व रुंद खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण तीन किलोमीटरच्या रस्त्यात अडीच किलोमीटर रस्ता अक्षरश: खड्ड्याच्या आश्रित झालेला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात का होईना, हे खड्डे भरणे अत्यंत आवश्यक आहे.
पालांदूर-मऱ्हेगाव ते जैतपूर (बारव्हा) हा रस्ता राज्यमार्ग म्हणून घोषित झालेला आहे; परंतु या मार्गावर आधी चूलबंद नदीवर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुलाचे बांधकाम झाल्यानंतर रस्त्याचे काम केले जाणार असल्याचे बांधकाम विभाग लाखांदूरकडून समजले.
चौकट /डबा
चूलबंद नदी ही मऱ्हेगावची जीवनदायिनी आहे. या नदीची रेती बांधकामाकरिता गुणवत्तापूर्ण आहे. त्यामुळे यापूर्वी घाट लिलावात जाऊन रस्त्याची धूळधाण झाली. रेतीचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने वर्दळही वाढली. त्यामुळे जुना मऱ्हेगाव ते पालांदूर व नवीन मऱ्हेगाव असे दोन्ही रस्ते खड्ड्याच्या आश्रित झालेले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.
कोट
मऱ्हेगाव ते पालांदूर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी केली आहे. आर्थिक नियोजनात या रस्त्याचे नियोजन करणार असल्याचे समजले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकरिता पाठपुरावा नियमित सुरू आहे.
देवकन बेंदवार, सरपंच, मऱ्हेगाव
210721\img-20210720-wa0081.jpg
पालांदूर ते मरेगाव रस्त्याची दुर्दशा!