लोकमत न्यूज नेटवर्कजवाहर नगर : भंडाराहुन चंद्रपूरला दोन चारचाकी वाहन जात असताना, खरबी नाका येथे पेट्रोलियम दरम्यान वाहन थांबवून झडती घेतली. यात दारूची अवैध वाहतूक करताना आढळले. यावेळी चार जणांना अटक करुन दारु साठा जप्त करण्यात आला. सदर साहित्याची किंमत दोन लक्ष ७२ हजार ३२० रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०) सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून दारू वाहतूक करताना आढळले. चाैकशी केली असता विना परवाना दारुची वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे, सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे यांनी पोलीस निरीक्षक एस बी ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.फिर्यादी गिरीश राणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार मिलिंद जनबंधू व सहकारी करीत आहे.
खरबीत तीन लाखांची दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 5:00 AM
पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०) सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून दारू वाहतूक करताना आढळले.
ठळक मुद्देजवाहरनगर पाेलिसांची कारवाई