आॅनलाईन लोकमतभंडारा : जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नियोजित पाहुणे आले नाही. यावरून अपंग हा दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. अपंगांना मिळणारा तीन टक्के निधी हा अपुरा असून त्यात वाढ करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव असलेला तीन टक्के निधी अपंगांच्या विकासासाठीच खर्च करावा, असे प्रतिपादन जि.प. सदस्य निलीमा इलमे यांनी केले.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे, समाज कल्याण समिती जि.प. भंडारा यांचे विद्यमाने आयोजित दिव्यांग मुली-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा शिवाजी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले. रविवारला स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प. समाज कल्याण समिती सदस्य निलीमा नानाजी इलमे बोलत होत्या. उद्घाटन परिवर्तन शिक्षण संस्था वासोळाचे सचिव तथा नॅशनल ट्रस्टचे सदस्य संजय घोळके यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. समाज कल्याण अधिकारी व्ही.के. झिंगरे, शासकीय अंध विद्यालय भंडाराचे अधीक्षक व्ही.एल. उमप, सहा. लेखाधिकरी तथा अपंग विभागाचे प्रभारी डी.सी. रोकडे, समाजकल्याण निरीक्षक आर.एन. नाईक, वरिष्ठ सहाय्यक एस.आर. बारई, बांते, गाढवे, डुंभरे, केजरीवाल सहभागी विद्यालयाचे संचालक व मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी झिंगरे यांनी, दिव्यांग कमजोर नाही. अनेक क्षेत्रात दिव्यांगांनी उत्कृष्ट भरारी घेतली आहे. यावरून त्यांना दिव्यशक्ती असल्याचे दिसून येते. दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाकरिता शासन कटीबद्ध आहे. दिव्यांगांनी मिळणाºया सोयी सवलती याचा लाभ घेऊन आपला विकास करावा, असेही प्रतिपादन केले. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर शहारे यांनी केले. तर आभार अंध विद्यालयाचे अधीक्षक व्ही.एल. उमप यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, अंध विद्यालयाचे कर्मचारी, सहभागी शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व कर्मचारी हे सहकार्य करीत आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळांचे ४५० च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.ही स्पर्धा दिव्यांगासाठी पुढील आयुष्याला नवी उमेद देणारी ठरणारी आहे. या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोमवारला होणार आहे. आज दिवसभर विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
अपंगांना मिळणारा तीन टक्के निधी अपुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:10 PM
जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नियोजित पाहुणे आले नाही. यावरून अपंग हा दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देनिलीमा इलमे : अपंग जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन