शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 9:30 PM

गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : प्रकरण अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.याबाबत असे की, अल्पवयीन पीडित मुलीची आई व वडील घटनेच्या एक महिन्यापासून मजूरी कामाने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मुलगी व तिच्या दोन बहिणी काकाकडे राहत होते. १६ डिसेंबर २०१४ रोजी रात्रीला जेवण केल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास मुलगी घरासमोरील अंगणात लघुशंकेसाठी निघाली होती. दरम्यान गावातीलच सचिन पुंडलीक चांदेवार याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार करून आरडाओरड केली असता सचिन हा घटनास्थळावरून पळून गेला.घटनेची माहिती काका व काकूला सांगितली. त्यानंतर साकोली पोलीस ठाण्यातून घटनेसंबंधी तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी सचिन पुंडलीक चांदेवार याच्याविरुद्ध भादंवि ३५४ अ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ नुसार सहकलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला.सचिन चांदेवार याला अटक करून साकोली पोलिसांनी घटनेचा तपास केला. तपासानंतर पोलिसांनी सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दोषारोपण केले. न्यायालयाने साक्ष पुरावाच्या तपासाअंती सचिन चांदेवार याला शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.दुर्गा तलमले यांनी युक्तिवाद केला.