लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला. दरम्यान, या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भाजीपाला व दूधाचे मोफत वितरण करून भारत माता की जय, जय जवान-मेला किसान’ चा नवा नारा देण्यात आला.मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, निलज, मोहगाव, नवेगाव, करडी, जांभोरा, लेंडेझरी, किसनपूर, पालोरा, खडकी, मुंढरी, पांजरा, बोरगाव, ढिवरवाडा येथील शेतकऱ्यांनी देव्हाडा येथे तुमसर ते गोंदिया मार्गावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निषेध आंदोलन केले. भाजपा सरकारचे धोरण हे भांडवलदारांच्या हिताचे असून शेतकरी व शेतमजूरांना गुलाम बनविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. यावेळी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार ऊस, धान, कापूस व अन्य शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफ्यासह हमी भाव देण्यात यावा. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, दूधाचे व शेतमालाचे पडलेले भाव वाढविण्यात यावे. खते, किटकनाशके, पशुखाद्यांचे दर कमी करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावे, कृषीपंपाचे बिल माफ करावे, शेतकरी व शेतीविरोधी धोरणे बंद करावी. जिल्ह्याला दुष्काळाचा लाभ देण्यात यावा, तुडतुडा, मावा, किडीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दिलेली मदत तोंडाला पाने पुसणारी असून ८० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. मागील वर्षी करडी परिसरात ३७ टक्के रोवणी होऊन ६३ टक्के क्षेत्र पडीत राहिले. रोवणीविणा पडीत शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना खाजगी पीक विमा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प राहिली. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.या आंदोलनात चुन्नीलाल माटे, सुधीर बांते, जालंदर गाढवे, सुरेंद्र गाढवे, शंकर डोळस, शैलेश कांबळे, तेजराम माटे, योगेश्वर गाढवे, दिनेश गाढवे, राजेश गाढवे, मारोती गाढवे, गुरुदेव बुध्दे, विलास गाढवे, लक्ष्मण धोटे, प्रदिप कावळे, मंगेश साठवणे, संजय साठवणे, अन्ना राखडे, रामभाऊ नेरकर, गुड्डू कांबळे, संतोष पचघरे, सुर्यभान बोंदरे, जागेश्वर बोंदरे, जयराम बोंदरे, रामकृष्ण कुकडे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी होते.
रस्त्यावर फेकले दूध, भाजीपाला, धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:39 PM
सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला.
ठळक मुद्देसंपाला पाठिंबा : शेतकऱ्यांनी नोंदविला शासनाचा निषेध