मोहाडी : कोरोना संकटामुळे सहा वेळा सतत लांबत गेलेली पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अखेर १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील १५ हजार ४९ शालेय विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. कोरोना काळातील शाळास्तरावर होणारी ही पहिलीच ऑफलाईन परीक्षा असल्याने शिक्षण विभाग पूर्णपणे दक्षता घेत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यात ९४ परीक्षा केंद्रे निश्चित केले आहे. त्यात पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५०, तर आठवींच्या विद्यार्थ्यांसाठी ४४ परीक्षा केंद्रे आहेत. पाचवीचे आठ हजार १६२ आणि आठवीचे सहा हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. बहुतांश परीक्षा केंद्रे तालुकास्तरावर, तर काही केंद्र खेड्यातही आहेत. कोरोनाची दक्षता बाळगण्यासाठी एका वर्गात केवळ २४ विद्यार्थ्यांना बसविले जाणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी असेल, शिवाय परीक्षा केंद्रावर वापरण्यासाठी पुण्याच्या परीक्षा परिषदेतर्फे सॅनिटायझरचा साठा प्रत्येक पंचायत समितीपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या परीक्षेसाठी पहिला पेपर सकाळी ११ ते १२ आणि दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. या ऑफलाईन परीक्षेवर प्रत्येक पंचायत समितीचे भरारी पथक नजर ठेवणार आहे, तर शिक्षणाधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वातील पथक कोणत्याही वेळी शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा
तालुकानिहाय केंद्र व विद्यार्थी संख्या
पूर्व उच्च प्राथमिक
तालुका केंद्र संख्या विद्यार्थी
तुमसर १० १२००
मोहाडी १० १८५१
भंडारा ०८ १६६९
लाखनी ०७ ८६९
साकोली ०४ ९१३
लाखांदूर ०४ ७७३
पवनी ०७ ८८७
पूर्व माध्यमिक
तालुका केंद्र संख्या विद्यार्थी
तुमसर ०९ १०८२
मोहाडी १० १७६२
भंडारा ०८ १३९१
लाखनी ०६ ६५४
साकोली ०४ ८२०
लाखांदूर ०३ ५३५
पवनी ०४ ६४३
वर्ग - ५ला ला एकूण विद्यार्थी परीक्षेत बसले - ८१६२
वर्ग - ८ ला एकूण विद्यार्थी परीक्षेत बसले - ६८८७
कोट
विविध कारणांनी परीक्षा पुढे ढकलली गेली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आनंदी व भीतीमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी.
मनोहर बारस्कर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद, भंडारा
090821\4718images (1).jpeg
पंधरा हजार विद्यार्थ्यांची गुरुवारी शिष्यवृत्ती परीक्षा
९४ परीक्षा केंद्र :शिक्षण विभागाची तयारी: