शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पीओपीमुळे मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:43 PM

हिंदू धर्मातील गणेश उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मी पूजन आले का या माती मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापराने कमी वेळात व सुंदर मूर्तींची निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील कुंभारबांधव व मातीमूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

ठळक मुद्देआगमन गणरायाचे : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्र्तींवरील बंदीची अंमलबजावणी करा

प्रकाश हातेल ।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : हिंदू धर्मातील गणेश उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मी पूजन आले का या माती मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापराने कमी वेळात व सुंदर मूर्तींची निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील कुंभारबांधव व मातीमूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून संबोधल्या जातो. जिल्ह्यात विविध प्रकारची माती उपलब्ध आहे. मुर्तीकारांना पर जिल्ह्यात जावे लागत नाही. शहरी भागात मातीचे मुर्तीला प्रचंड मागणी आहे. मात्र काही मुर्तीकार पैशाच्या हव्यासापोटी कमी वेळा जास्त पैसे कसे कमविता येईल. म्हणून प्लास्टिकच्या साच्याद्वारे प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती तयार करीत आहेत. तर काही मोठे धनदांडगे मूर्तिकार पर जिल्ह्यातून मूर्तींची आयात करित आहेत.प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. विसर्जन स्थळ नदी, नाले, तलावात पाण्यावर तरंगतात. पीओपीमध्ये रसायन असल्याने जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. नदी, नाले, तलावातील दूषित पाणी पाळीव जनावरे पितात व त्यांना विविध आजाराचा सामना करावा लागतो. तर जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात.श्रद्धाळू देविदेवतांची दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून ती मुर्ती पाण्यावर तरंगतच राहत असल्याने त्या मूर्तीची व श्रद्धेची विटंबना नव्हे काम असा प्रश्न अनेक श्रद्धाळू करीत आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्यांना लाल रंगाची मार्कींग असने बंधनकारक आहे तर मूर्र्र्तींवर मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही अशा मूर्ती राजरोसपणे बाजारात उपलब्ध असतात. ही प्लॉस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती विकणाऱ्या ग्राहकांना साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून शासनाची व ग्राहकांची दिशाभूल करित आहेत. अशा मूर्र्तींचे विसर्जन करतेवेळी उपलब्ध असलेले पाण्याची ठिकाणी आसरा घेतल्यामुळे या मूर्ती पाण्यावर तरंगतांना दिसतात. त्यातही अनेक मुर्त्या विद्रुप अवस्थेत आढळतात. या प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये असलेल्या रसायनामुळे हे पाणी प्रदूषणयुक्त असते. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवतो.पवनी तालुक्यात कुंभार व मूर्ती कलावंत २० ते २५ च्या घरात असून बार महिन्यातून दोन महिने मुर्त्या तयार करून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा पिढ्यान पिढ्या चाललेला व्यवसाय आहे. मात्र जिल्ह्यात भंडारा, कोंढा, पवनी, तुमसर, लाखनी आदी नामवंत मुर्तीकारांनी प्लॉटर आॅफ पॅरिसच्या लहान मूर्तीपासून ६ ते १० फुट उंच मुर्त्या परजिल्ह्यातून आयात करित आहेत.मानवी जीवास धोका निर्माण ठरू शकणाऱ्या आणि कुंभार समाजाचा व मातीमुर्ती कलावंताचा रोजगार हिरावणाºया प्लॉटर आॅफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीवर कायमची बंदी घालण्याची मागणी जिल्ह्यातील कुंभार ग्राहकांना साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून फसवितात. अशा मुर्ती विसर्जन करतेवेळी उपलब्ध असलेले पाण्याचे ठिकाणी आसरा घेतल्यामुळे या मूर्र्तीं पाण्यावर तरंगताना दिसतात त्यातही त्या खंडीत अवस्थेत आढळतात. अशावेळी धार्मिक भावनाही दुखावण्याचे प्रकारही घडतात.दुसरीकडे जलचरांसह मानवी आरोग्याला धोका उद्भवतो. मानवी जीवास धोका निर्माण ठरू शकणाऱ्या आणि कुंभार समाजाचा रोजगार हिरावणाऱ्या प्लॉटर आॅफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीकर कायमची बंदी घालण्याची मागणी जिल्ह्यातील कुंभार समाज व माती मूर्तिकारांनी केली आहे.शाळू माती व काळी मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री करतात. अशा मूर्त्यांची चौकशी करून त्या मूर्तिकारांवर कडक कारवाई करून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणा व ग्रामीण कलावंतांना न्याय द्या.-गजानन बावणे, मूर्तिकार रोहा.ज्या मूर्त्यांपासून मानवाला व सुक्ष्म जीव जंतूला हानी होतो अशा मुर्तीवर बंदी घालून ग्रामीण मूर्ती! कलावंतांना न्याय द्या तरच ही कला जिवंत राहील.-कलीम शेख, निसर्ग प्रेमी अड्याळ.प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्तीने होणारा जलप्रदूषण व ही मुर्ती पाण्यात डूबत नसल्याने होणारा देविदेवतांची विटंबना होत आहे तर सदर मुर्ती घेतेवळी हे मुर्तीकार साडू मातीची मूर्ती असल्याचे सांगून विक्री करतात हे माझे घेतलेले अनुभव आहे. करिता या मूर्र्तींवर शासनाने बंदी आणावी.-रिंंकू सलूजा, सामाजिक कार्यकर्ता.