लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे नाल्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणे कठीण झाले आहे. शेतातील बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने रोवणी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या २३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.प्राप्त माहितीनुसार नाल्याच्या वरच्या भागात छत्रपाल परतेकी, केवलराम परतेकी, सेवकराम परतेकी, चंद्रशेखर परतेकी, नारायण पंधरे, विलास पंधरे, प्रल्हाद पंधरे, लेमन पंधरे, तिजूराम टेकाम, मनिराम पंधरे, भागवत पंधरे, अनिरुध्द पंधरे, हेमराज वाढीवे, भोजराज वाढीवे, सुरेंद्र वाढीवे, रुपचंद वाढीवे, रमेश वाढीवे, गणेश वाढीवे, विना सलामे, लक्ष्मी पंधरे, पारबता वाढीवे व सुमा वाढीवे या शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र या परिसरातील नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाण्याची अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतीची कामे करायची कशी असा प्रश्न निर्माण होतो. तर बरेचदा शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागते. यंदा याच नाल्यावर लघू पाटबंधारे विभागाकडून मग्रारोहयोची कामे करण्यात आली. त्यामध्ये फरसाची दीड फूट उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत अधिक वाढ झाली. परिणामी छत्रपाल परतेकी यांचे गट क्र. ८९ व ८३ मधील शेत पाण्याखाली आले. जवळपास एक हेक्टर शेती बुडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या सर्व शेतकऱ्यांचा शेती हाच व्यवसाय असून यावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. शेतातील बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने पिक वाया जाण्याची शक्यता आहे.उपोषणाचा इशारास्थानिक प्रशासनाने येथील नाल्यावर पूल तयार करुन देवून समस्या मार्गी लावावी. अन्यथा या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा परिसरातील शेतकºयांनी दिला आहे.प्रशासनाचे दुर्लक्षशेंडा येथील शेतकऱ्यांनी नाल्यावर पूल तयार करुन देण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाकडे निवेदन देऊन अनेकदा केली. तसेच लोकप्रतिनिधींना सुध्दा यासंबंधिचे निवेदन दिले. मात्र अद्यापही शासन आणि प्रशासनाने त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.शासन आदिवासींच्या विकासासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.सध्या मी बैठकीसाठी बाहेर आहे. कार्यालयात पोहचल्यानंतर याची माहिती घेवून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार.-अखिलभारत मेश्राम, तहसीलदार सडक-अर्जुनीशेतकऱ्यांची तक्रार अद्याप मला प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त होताच पंचनामा करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.- एस.बी.राठोड, तलाठी साजा क्रं. १३ शेंडा
शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:17 PM
येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
ठळक मुद्देपावसामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद : प्रशासनाने दखल घेण्याची गरज