शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अवकाळीने धान उत्पादक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:00 AM

लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.

ठळक मुद्देगारपिटीने घरांचे नुकसान । पीडितांच्या आर्थिक मदतीकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर कधी अवकाळी पाऊस व गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले आहेत. हातात आलेले उन्हाळी धानपिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असताना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.काही धानाचा निसवा होण्यापूर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुक्त धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकऱ्यांत वर्तविली जात आहे.या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरताना ऊन्हाळी पीक ऊत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे. महागडे बी-बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर ऊन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.दरम्यान, खरीप हंगामात व ऊन्हाळी हंगामातही पावसाचे थैमान सुरु असल्याने निसर्ग कोपात अडकलेला शेतकरी पुढील काही महिन्यात सुरु होणाºया खरीप हंगामातही संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रात्रभर वीज खंडितपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून सुसाट जोरदार वादळी वाºयासह विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व पाथरी येथे गारपीट झाल्याची माहिती आहे. शेत शिवारातील झाडे उन्मळून पडली. मºहेगाव येथील कौलारू साध्या घरांचे नुकसान झाले. तई येथील गोपीचंद भंडारकर यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले.उन्हाळी धानाचा हंगाम जोमात सुरू असताना वादळी वारा व पावसामुळे शेतकºयांच्या कळपा भिजल्या. हमीभाव खरेदी केंद्रावरील धान सुद्धा ओले झाले. शेतकºयांच्या शेतावरील मळणी करून विक्रीसाठी उपलब्ध असलेले धानाची पोते सुद्धा ओली झाली. पालांदूर - आसगाव मार्गावर दोन ठिकाणी वीज पडल्याने रात्रभर वीज प्रवाह खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे आबालवृद्धांना त्रास सहन करीत महावितरणवर रोष व्यक्त करण्यात आला. पोहरा येथून पालांदूरला जोडण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित वीज दाब न मिळाल्याने अख्खी रात्र अंधारातच डासांच्या सोबतीने पालांदूर परिसरातील ५४ गावे संकटात होती.वीज अभियंता व प्रधान तंत्रज्ञ यांच्यासह संपूर्ण वीज कर्मचारी अख्ख्या रात्रभर आसगाव ते पालांदूर या ३३ केव्ही वर दोष शोधण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यांनावीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यूमासळ : वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. सदरची दुर्घटना शुक्रवारी १५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे घडली. किन्ही गुंजेपार गावापासून जवळपास १० किमी अंतरावर विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात तालुक्यातील अन्य काही शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांचा ठिय्या होता. दिवसभर शेळ्यांना चराई करुन आणून राञीदरम्यान त्यांना शेतशिवारात बांधल्या जात असे. यातच विज कोसळून शेतशिवारात असलेल्या तब्बल १५ शेळ्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत जैतपूर (बारव्हा) येथील हिरालाल ठाकरे, शुत्तम कोरे, निलेश गोमासे, गौरी नागोसे, चोपराम पंधरे यांच्या शेळ्या मृत्युमुखी पडल्या. नुकसान भरपाईची मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस