भंडारा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन प्रलंबित आहेत. सुमारे सात कोटी रूपयांची थकबाकी असल्याने अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत ३२ शाळांमधील सुमारे ८९६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती नसल्याचे कारण पुढे करून येथील कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासूनचे वेतन थकित केले आहे. याबाबत अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने प्रकल्प कार्यालय तथा अप्पर आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देवून थकित वेतन देण्याची मागणी केली. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.(शहर प्रतिनिधी)
९०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
By admin | Published: September 10, 2015 12:26 AM