शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

By admin | Published: September 17, 2015 12:37 AM

नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र आॅगस्ट महिन्याचे वेतन रखडल्याने सुमारे ८३५ कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

८३५ कर्मचारी आर्थिक संकटात : पगार पत्रक बनविणाऱ्याचे पद रिक्तभंडारा : नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र आॅगस्ट महिन्याचे वेतन रखडल्याने सुमारे ८३५ कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व अन्य आरोग्य संस्थांमध्ये सुमारे ८३५ कर्मचारी कार्यरत आहेत. यात सुमारे ८५ वैद्यकिय अधिकारी तथा ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी आरोग्य विभागाच्या अधिनस्थ राहून ग्रामीण नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यरत आहेत. असे असताना अनेकदा हे मुख्यालयी राहून कार्य करतात. जिल्हयातील सातही तालुक्यात कार्यरत असलेल्या या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेतील वेतनपत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भरोशावर आहे.मात्र आरोग्य विभागात रिक्त असलेल्या अनेक पदापैकी एक वेतनपत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याचाही त्यात समावेश आहे. जिल्हयात वर्ग ३ व ४ मध्ये मोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान आरोग्य विभागाने दिलेले नाही. त्यामुळे आॅगस्ट महिन्याचा या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. यासोबतच वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.अनुदान नसल्याने तथा वेतन पत्रक उशिरा प्राप्त झाल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेत वेतन पत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्याने भुयार प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला भंडारा आरोग्य अधिकाऱ्याचा कार्यालयात अतिरिक्त जबाबदारीवर बोलाविल्या जात होते. त्यामुळे तो एकमेव कर्मचारी जिल्हयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी तत्पर राहत होता. मात्र भुयार येथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी सदर कर्मचाऱ्याला या महिन्यात अतिरिक्त जबाबदारीवर पाठविण्यास नकार दिल्याने वेतनपत्रक बनविण्याची जबाबदारी अन्य कुणाकडेही सोपविण्यात आली नाही. तसेच ज्या व्यक्तीकडे वेतन पत्रक बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्याला संगणकाचे ज्ञान अवगत नसल्याची बाब समोर आली आहे.गणपती सारखा महत्वाचा उत्सव असल्याने कर्मचाऱ्यांना वेतनाची नितांत गरज असते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवल्याने सर्व कर्मचारी आता ‘बाप्पा’लाच वेतन मागण्यासाठी विनवणी करावी लागण्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)