शासनाने अतिक्रमित कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुसार घरकुल योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा, प्रतीक्षा यादीतील ‘ड’ प्रवर्गातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा, घरकुल अनुदान निधी तीन लक्ष रुपये करण्यात यावे व अपंग, विधवा, परित्यक्ता व भूमिहिनांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले जाणार आहे.
आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी, उपजिल्हाप्रमुख धनराज हटवार, साकोली विधानसभा प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्ने, तालुका प्रमुख प्रकाश नाकतोडे यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहेत. या आंदोलनात तालुक्यातील बहुसंख्य अतिक्रमणधारक कुटुंबांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रहार जनशक्ती पक्षांतर्गत करण्यात आले आहे.