शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ओबीसी संघटनांची नागपुरात आज बैठक

By admin | Published: June 19, 2016 12:23 AM

ओबीसी समाज आरक्षण, शिष्यवृत्ती, क्रिमिलेयरसह शासनाने अद्याप न काढलेले फ्रीशीपचे शासन निर्णयासह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी

भंडारा : ओबीसी समाज आरक्षण, शिष्यवृत्ती, क्रिमिलेयरसह शासनाने अद्याप न काढलेले फ्रीशीपचे शासन निर्णयासह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोबतच विदर्भात ओबीसीचे संघटन बळकट करण्यासाठी विदर्भस्तरीय ओबीसी संघटनेचे गठण करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे विदर्भस्तरीय सर्व ओबीसी संघटनाची बैठक सकाळी ११ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, अजनी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसीची जनगणना करण्यात यावी तसेच स्वतंत्र ओबीसींचे मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसींना क्रिमिलेयरची असंवैधानिक लादलेली अट रद्द करुन एससीएसटी प्रमाणे सवलत देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, केंद्राच्या १०० टक्के शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींना शिक्षणासोबतच नोकरीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसींच्या विद्याथ्यार्सांठी एमपीएससी व युपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे, ओबीसीची विदर्भस्तरीय कार्यकारीणी गठित करणे, मागील दोन वषार्पासून भाजपसरकारच्या सामाजिक न्याय विभागाने ओबीसींच्या हिताचे कुठलेच काम केलेले नाही. शिष्यवृत्तीचा प्रश्न रेंगाळत ठेवला असून अद्यापही (फ्रीशिप) शासन निर्णय काढलेला नाही, ओबीसी विरोधी सरकारच्या विरोधात २०१८ मध्ये विदर्भात ओबीसी जनजागृती रथयात्रा काढणे, या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी व चळवळीतील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समिती, बहुजन संघर्ष समिती, ओबीसी एकता मंच आदी संघटनांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)