भंडारा : केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता नगर परिषद गांधी चौक येथे बुंदी वाटप, ९ वाजता गणेश हायस्कूल, राजीव गांधी चौक येथे उज्वला योजनेचे गॅस वितरण आणि ई-रिक्षा वाटप होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, नगराध्यक्ष सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे, महामंत्री संजय कुभलकर, अजय ब्राम्हणकर, मनोज बोरकर, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
गडकरींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आज
By admin | Published: May 27, 2017 12:22 AM