लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील युवक- युवती हे कौशल्याचा खजिना आहेत. कौशल्य प्रत्येक माणसात जन्मजात असतो. त्याला योग्य मदत मिळाली तर कौशल्याच्या आधारावर त्याला जगात वेगळी ओळख निर्माण करता येते. आपल्यात असलेले कौशल्य उपयोगी आणण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन अतंर्गत भंडारा येथे महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रामचंद्र अवसरे, विभागीय प्रमुख मयूर पिल्लेवार, कार्यक्रम संयोजक पाल, केंद्रप्रमुख मिथुन डोंगरे, प्रशिक्षक कपिल गजभिये, मनीष मोटघरे, मयूर नागदेवे, मनोज श्यामकुवर, उपस्थित होते.ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य निखारणारे शिक्षण मिळाले तर त्यांना प्रगती करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या माध्यमातून युवक युवतींना भविष्य घडवण्याचे मार्ग खुले होणार आहेत. होतकरू तरुणांना आर्थिक संपन्नता निर्माण करता यावी व रोजगार उपन्न व्हावा म्हणून या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक युवतींनी या संधीचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार पटोले यांनी केले.नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्थापन झालेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण न घेणारे किंवा शिक्षण घेऊनही रोजगार उपलब्ध न झालेल्या युवक युवतींना या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रचलित धोरणानुसार विविध पाच विभागाचे प्रशिक्षण देण्याबरोबर सहभागी युवकांना रोजगार मिळेपर्यंत सर्व सुविधा व मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार सदर सर्व प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची माहिती केंद्र प्रशिक्षक मयूर नागदेवे यांनी दिली.जिल्ह्यातील १८ ते ३० वयोगटातील १० वी उत्तीर्ण युवक व युवती हे प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. तीन महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न व पेय सेवा व्यवस्थापन, इतर घरगुती उपकरण दुरुस्ती व देखभाल, संगणीय उपकरणाचे तंत्रज्ञान, वेअर हाऊस व सीसीटीव्ही तंत्रज्ञान शिक्षण देण्यात येणार आहे. नुसते प्रशिक्षण देण्यात येणार नसून याद्वारे रोजगार मिळेपर्यंत केंद्रातून मदत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मयूर पिल्लेवार यांनी
आजचे युवक कौशल्याचा खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:29 PM
ग्रामीण भागातील युवक- युवती हे कौशल्याचा खजिना आहेत. कौशल्य प्रत्येक माणसात जन्मजात असतो.
ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : भंडारा येथे प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन