शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रस्त्यावर टोमॅटोंचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:48 PM

नागपूरहून भंडाराकडे जाणाºया ट्रक व मिनीडोर यांच्यात झालेल्या धडकेनंतर ट्रकची सायकल चालकाला धडक लागली. यात सायकलचालक गंभीररीत्या जखमी झाला.

ठळक मुद्देठाणा येथील घटना : ट्रक उलटून दोन गंभीररीत्या जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : नागपूरहून भंडाराकडे जाणाºया ट्रक व मिनीडोर यांच्यात झालेल्या धडकेनंतर ट्रकची सायकल चालकाला धडक लागली. यात सायकलचालक गंभीररीत्या जखमी झाला. त्याला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारला सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोलपंप येथे घडली.इस्तारी सुर्यभान आकरे (३८) रा.खरबी नाका असे जखमी इसमाचे नाव असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. नागपूरहून भंडाºयाच्या दिशेने भाजीपाला वाहून नेणारा मिनी ट्रक (क्र.एमएच ३६ एफ १९५८) ला मागेहून टमाटर वाहून नेणाºया ट्रक (क्र.एमएच ३६ एए ००६४) ने जोरदार धडक दिली. यात मिनीट्रकला तीन फुटापर्यंत फरफटत नेले. यात हा मिनीट्रक लोखंडी सुरक्षा कठळ्याला जावून लटकला. ट्रकही लोखंडी सुरक्षा रेलिंग तुडवित रस्त्याच्या खाली उतरला. दरम्यान सर्व्हिस रस्त्यावरून खरबीहून ठाण्याकडे जाणाºया सायकल चालकाला ट्रकने फरफटत नेले. यात सायकलचा चुराडा झाला. दरम्यान खोलगट भागात ट्रक उलटला. ट्रकचालकाला दर्शनी भागाचे काच फोडून बाहेर काढण्यात आले.सायकल चालक इस्तारी आकरे यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून दोन्ही पाय निकामी झाल्याचे सांगितले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. तासाभरानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.माथनी पथकर कर्मचाºयांनी क्रेनच्या सहायाने मिनी ट्रक व ट्रकला बाजुला करीत रहदारी सुरळीत केली. ट्रकचालक भंडारा रूग्णालयात प्रथमोपचार करून रूग्णालयातून पळून गेला.मिनीट्रकचा मालक चंद्रलाल चिचमलकर रा.सेंद्री यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिती आडे या करीत आहेत.आजीच्या मयतीला जाण्यापूर्वीच घालाइस्तारी आकरे यांच्या आजीचा वर्षभरापूर्वी अपघात झाला होता. यात आजीचे पाय निकामी झाले होते. आजीच्या निधनाची माहिती मिळताच ते सकाळी सायकलने अंत्यविधीकरीता निघाले. दरम्यान ठाणा पेट्रोलपंप उड्डाण पुलालगत सपाटे मंगल कार्यालयाजवळ त्यांचा अपघात होऊन दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे ते आजीच्या अंत्यसंस्काराला जाण्यापासून मुकले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाºया इस्तारी यांच्या पत्नीला आता दोन मुलांसह पतीचा सांभाळ करावा लागणार आहे.