शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

तुमसरात गोळीबारातून पेटली आॅगस्ट क्रांतीची मशाल

By admin | Published: August 14, 2016 12:17 AM

स्वातंत्र्य चळवळीत तुमसर हे भंडारा जिल्ह्यातील एक प्रमुख केंद्र होते. येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता.

१४ आॅगस्ट १९४२ ची घटना : पोलिसांनी केला होता मिरवणुकीवर गोळीबार, सहा जण शहीदमोहन भोयर तुमसर स्वातंत्र्य चळवळीत तुमसर हे भंडारा जिल्ह्यातील एक प्रमुख केंद्र होते. येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता. १९१८ साली दुष्काळ पडला होता. ते धान्य बाहेर जाऊ नये याकरिता येथे पुढाकार घेण्यात आले होते. तुमसरला शहीद नगरी असेही त्याकाळी संबोधल्या जात होते हे विशेष.बापूराव पेंढारकर, कृष्णअप्पा वाजीप्पा व छोटू पहेलवान यांना सत्याग्रह प्रकरणात अटक करण्यात आली होती. तुमसरात राष्ट्रीय शिक्षण देणारे राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना झाली. तेथून स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शिक्षण मिळू लागले होते. इंग्रज शासनाविरूद्ध हे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत होते.सन १९५३ मध्ये झेंडा सत्याग्रह सुरू झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण समरीत व सिहोऱ्याचे गोपीचंद तुरकर यांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यात त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. १९२७ मध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज, डॉक्टर लोहीया हे हरीजन फंड जमा करण्याकरिता तुमसरात आले होते. त्यांचा मुक्काम तुमसरात सेठ पातोचंद मोर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. त्यावेळी गांधीजी यांनी राष्ट्रीय शाळेला भेट दिली होती. तथा जून्या गंज बाजारात जाहीर भाषण दिले होते. फत्तेचंद मोर यांनी २५०० रूपयांची थैली भेट दिली. बहिष्काराचे आरक्षणाचा उपयोग करण्यात आला.सन १९२९ मध्ये तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. २ आॅक्टोबर १९२९ रोजी महात्माजींच्या जन्मदिनी सेठ फत्तेचंद मोर यांनी तशी नोटीस दिली होती.वामनराव जोशी यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. सन १९३० रोजी जंगल सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. सरकारचे जंगल लिलाव व दारू लिलाव यावर बहिष्कार घालण्याचे व सत्याग्रह सुरू करण्याचे ठरले. यात मो.प. दामले, वासुदेव कोंडेवार, कल्लु हलवाई, हरीश्चंद्र भोले, बालाजी पहेलवान, बापू समरीत यांना पोलिसांनी चोप दिला तथा शिक्षा ठोठावण्यात आली.काँग्रेसच्या आदेशानुसार १४ आॅगस्ट १९४२ रोजी तुमसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी मिरवणूक काढली. ही मिरवणूक तुमसर पोलीस ठाण्यावर काँग्रेसी तिरंगी निशान लावण्याचे तयारीने गेली होती. ती मिरवणूक पोलिसांनी अडवून लाठी चार्ज केला. परंतु लोकं तसुभरही हलले नाही. जिल्हाधिकारी जयवंत यांनी गोळीबाराचा आदेश दिला. त्या गोळीबारात श्रीराम रामजी धुर्वे, भदूजी रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये, करडी, पांडूरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पैकु धुर्वे हे सहा जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. कित्येक जण जखमी झाले. शवयात्रा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. प्रेत आमच्या स्वाधीन न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मो.प. दामले, सदाशिव किटे यांनी दिला.सन १९५० मध्ये पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी राष्ट्रीय शाळेना भेट दिली. मार्गदर्शन केले. १९४२ च्या सहा जण शहीद झाले. त्यांचे स्मारकाकरिता तुमसर नगर काँगे्रस कमेटीला नझूलची साडे आठ हजार फूट जागा देण्यात आली. त्या जागेवर राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते शहीद स्मारकांचे भूमिपूजन झाले होते. या जागेवर सध्या एका लहानसा हॉल तयार करण्यात आला. उर्वरित जागेवर येथे अतिक्रमण करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रभाव जिल्ह्यात पसरला होता. त्यामुळेच काँग्रेसचे दिग्गज नेते मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, महात्मा भगवानदास, पंडित सुंदरलाल, राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, डी. पट्टीमोसिता रामय्या, जयप्रकाश नारायण, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाडगीळ येथे येऊन गेले व त्यांनी गौरवोद्गार काढल्याची माहिती राष्ट्रीय विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक कोंडेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.