लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील चिखला परिसरात रानडुकरांनी शेतातील उभे ऊस पिकांची नासधुस करुन उध्दवस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे. वन्यप्राण्यांपासून पीकांचा बचाव कसा करावा. या विवंचनेत येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक शेतकरी येथे त्रस्त झाला आहे. प्रत्येकाचे किमान दोन ते तीन लाखांचे आर्थिक नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर संकट कोसळले आहे. रानडुकरांना हाकलून लावणे मोठे जिकरीचे व धोकादायक काम आहे.यासंदर्भात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. परंतु कारवाई शून्य आहे. पीकांचे नुकसानीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न त्यांना सतत भेडसावीत आहे. शेतात जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. उभ्या पिकांची नासाडी पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.चिखला परिसराला लागूनच जंगल आहे. त्यामुळे रानडुकरांच्या टोळ्या शेतातील उभी पीक नष्ट करीत आहेत. त्यांचा कायम बंदोबस्त वनविभागाने करण्याची गरज आहे. फटाके फोडून शेतकरी रानडुकर काही प्रमाणात परत पाठविण्यात यशस्वी होतात. परंतु रात्री व पहाटे पुन्हा रानडुकर उभ्या पिकांची नासाडी सतत करीत आहेत. वनविभागाने येथे कायम स्वरुपी उपाययोजना करुन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.
रानडुकरांनी केले ऊसपीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:46 AM
शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे. चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे.
ठळक मुद्देचिखला शिवारातील प्रकार : शेतकऱ्यांवर संकट, वनविभागाचे दुर्लक्ष