शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

तुमसर-मोहाडी बाजार समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Published: March 26, 2016 12:25 AM

राज्यात तांदळाकरिता प्रसिध्द तुमसर-मोहाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.

उच्च न्यायालयाचे निर्देश : चार महिन्यांत होणार निवडणूकमोहन भोयर  तुमसरराज्यात तांदळाकरिता प्रसिध्द तुमसर-मोहाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. येत्या चार महिन्यात निवडणूका घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले. तब्बल ६ वर्षे ७ महिन्याच्या लांब कार्यकाळानंतर येथे निवडणूक होत आहेत. निवडणुकीकरिता राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. राजकारणाच्या केंद्रबिंदू म्हणून या बाजार समितीकडे पाहिले जाते. थेट शेतकऱ्यांशी संबंधित असेली व दोन तालुक्यात कार्यक्षेत्र असल्याने या बाजार समितीच्या निवडणुकीला मोठे महत्व आहे. २१ सदस्यीय या बाजार समितीत सेवा सहकारी संस्था गटातून ११ संचालक, ग्रामपंचायत गटातून ४, अडते व्यापारी गट २, प्रकीया गट १, पंचायत समितीमधून १, निमंत्रित सदस्य १, नगरपरिषदेतून १ यांचा समावेश होतो. तुमसर तालुक्यात ९७ व मोहाडी ताुक्यातील ७५ ग्रामपचांयतीचे सदस्य येथील ग्रामपचांयतगट मतदानात भाग घेतात.सन २००९ मध्ये या बाजार समितीच्या निवडणूका झाल्या होत्या. दर पाच वर्षांनी निवडणूका घेण्याचा नियम आहे, या वेळी तब्बल ६ वर्षे ७ महिन्यानंतर निवडणूका होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्ती वासंती नाईक व ए. एस. चांदूरकर यांच्या पिठाने २४ फेब्रुवारी २०१६ ला चार महिन्यात तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. निवडणुकीपर्यंत जुनेच संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना सन १९६२ मध्ये झाली होती. सन १९७२ पासून बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले होते. २ कोटीचे वार्षिक उत्पन्न या बाजार समितीचे आहे. अनेक राजकारण्यांना बाजार समितीची निवडणूक खुणावते. सध्या भाऊराव तुमसरे सभापती तर उपसभापती राजकुमार माटे आहेत. सन २००९ मध्ये निवडणुकीत काँग्रेस-राकां ने बाजार समितीवर कब्जा केला होता. सदर निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. पक्षाचे पदाधिकारी निवडणूका लढवितात.सन २००४ मध्ये तत्कालीन खासदार शिशुपाल पटले सभापती असतांनी खासदारकीची निवडणूक जिंकले होते. तुमसर मोहाडी विधानसभेत भाजपचे आमदार चरण वाघमारे आहेत. त्यामुळे भाजप सक्रीय आहे. सहयोगी पक्षाचे शिवसेनेचे नवीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, काँग्रेस व राकां येथील निवडणुकीची मोर्चेबांधणीला लागले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी तुमसरचे असल्याने भाजप येथे पुर्ण ताकदीनीशी उतरण्याची शक्यता आहे. पुढील काळात ही निवडणूक राजकारणाला नवी दिशा ठरणारी राहणार आहे.