लवकरच होणार निवड : साकोलीचे तहसीलदार प्रभारी संजय साठवणे साकोलीनगरपरिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व स्विकृत सदस्याची निवडीनंतर आता वेळ आली ती विषय समिती व त्याच्या सभापतीच्या निवडीची. यातही सभापतीची निवड होणार की निवडणूक होणार? या सभापतीपदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली असून साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावातून दोन दोन सभापती येणार काय व सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल सोमवारी न.प.उपाध्यक्ष म्हणून तरूण मल्लाणी यांची तर स्विकृत सदस्य म्हणून मोहन चांदेवार व अॅड. दिलीप कातोरे यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नगरपरिषदेची पहिली बैठक पार पडली व यानंतर सात दिवसाच्या आत दुसरी बैठक घेवून या बैठकीत विषय समिती गठीत करण्यात येणार आहे. साकोली नगरपरिषद ही नवीन असल्यामुळे यात आरोग्य समिती, बांधकाम समिती, महिला व बाल कल्याण समिती, जल आणि मलनिसारण समिती अशा एकूण चार समित्या स्थापन केल्या जाऊ शकतात. यात महिला व बालकल्याण समितीचे सभापती हे या महिला नगरसेवकच राहिल्या तर उर्वरित तीन समित्यांचे सभापती हे महिला किंवा पुरूष यापैकी कोणालाही घेता येतात. एका विषय समितीमध्ये पाच सदस्य राहत असून त्यात एक सभापती व चार सदस्य राहतील तर एक स्थायी समिती असेल व या समितीचे अध्यक्ष हे नगरपरिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.साकोली नगरपरिषदेमध्ये अध्यक्षासह इतर १४ सदस्य हे भाजपाचे असल्यामुळे विषय समितीवर भाजपाच्याच नगरसेवकांची वर्णी लाणार हे निश्चित. यात अध्यक्ष हे सेंदुरवाफा तर उपाध्यक्ष हे साकोलीचे तर स्वीकृत सदस्यातही एक साकोली व एक सेंदुरवाफा येथील घेण्यात आली. त्यामुळे आता विषय समिती स्थापन करतानी याच फार्मुल्याचा विचार केल्यास दोन सभापती साकोली व दोन सभापती सेंदुरवाफा येथील होऊ शकतात. तसेच प्रभागनिहाय विचार सुद्धा होऊ शकतो. मात्र या सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागेल याची सध्या जुळवाजुळव सुरू आहे.प्रभारी मुख्याधिकारीसाकोली नगरपरिषद घोषित होताच साकोलीचे तहसीलदार खडतकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या अध्यक्षानी पदमुक्त केले. आता तहसीलदार हेच या नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यत आहेत.प्रशासकीय अधिकारीही प्रभारीचसध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून परमार यांनी आठवड्यातून फक्त तीन दिवस नियुक्ती केली आहे. परमार याचेकडे तुमसर नगरपरिषदेचा कार्यभार आहे. परमार हे फक्त तीन दिवस येत आहेत. प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी दोन्ही प्रभारी असल्यामुळे साकोली नगरपरिषदेचे कामे रखडलेली आहेत. त्यामुळे ही दोन्ही पदे शासनाने तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.
विषय समितीच्या सभापतिपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: January 18, 2017 12:22 AM