शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नृसिंह टेकडीचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:49 AM

शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

ठळक मुद्देएक कोटी ८० लाखांच्या विकास कामांना मंजूरी : मिळाले केवळ ५० लाख, उर्वरीत निधी केव्हा मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवरील देव्हाडा - माडगी पर्यटनीय तिर्थस्थळाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास निधीतून विविध कामांसाठी सुमारे एक कोटी ८९ लाखांचा निधी तीन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सीमेवर वैनगंगा नदीपात्रातील बेटावर निर्मित भगवान नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. या स्थळाला धार्मीक व पर्यटनीय महत्व आहे. पूर्व विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळाच्या विकासासाठी अनेकांनी आश्वासनांची खैरात वाढली. मोठमोठ्या निधीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्ष निधी खेचून आणण्यात दमछाक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे स्थळ पर्यटनीय विकासापासून वंचित राहिला. कार्तिक पौर्णिमेला येथे १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. या स्थळाला ऐतिहासिक महत्व असून पूर्व विदर्भात हजारो भाविक दरवर्षी येथे येतात.मंजूर पर्यटन विकास निधीचा पहिला २० लाखांचा टप्पा मिळाला. दुसºया टप्प्यात नुकताच ३० लाखांचा निधी प्राप्त झाला. प्राप्त एकूण ५० लाखांच्या निधीतून डांबर रस्ता, नाली बांधकाम, सेफ्टी वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तीन वर्षात विकास निधी केवळ ५० लाख रुपयांचा मिळाला. निवडणुकासमोर असल्याने सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांंच्या निधींची घोषणा करण्याचा सपाटा चालविला आहे. आश्वासनानंतर आश्वासने दिली जात आहेत. परंतु पाच वर्षापूर्वी निवडणुकीत मुंढरी ते रोहा पुलाच्या निर्माणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाहीत. बंद पडलेले उद्योग सुरु झालेले नाही. नृसिंह टेकडीसाठी पुरेसा निधी खेचून आणला गेला नाही. आता चौंडेश्वरी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासासाठी दोन कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून भूमिपूजन उरकण्यात आले. परंतु निधी पूर्ण मिळणार काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांचा आहे.राज्य शासनाच्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी उर्वरित एक कोटी ३९ लाखांचा निधी मिळणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु मोठ्या निधीची घोषणा करून पाठ थोपटण्यात धन्यता मानली जात असल्याने नृसिंह टेकडीचा पर्यटनीय विकास रखडला आहे. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेला आहे.पर्यटनासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.उर्वरीत विकास कामांना लागला 'ब्रेक'राज्याच्या पर्यटन विकास निधीतून स्थळापर्यंत जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण, सीमेंटीकरण, नाली बांधकाम, सायकल स्टँड, सेफ्टीवॉल, सभामंडप, किचनरुम, अतिथीगृह, शौचालय व वॉशरुम आदी कामे केली जाणार आहे. ५० लाखांच्या निधीतून डांबररस्ता, नाली बांधकाम, सेफ्टीवॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उर्वरीत कामांना निधीअभावी 'ब्रेक' लागला आहे.

टॅग्स :Templeमंदिर