लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनेक वर्षापूर्वी अत्यंत दुर्लक्षीत, उपेक्षित ऐतिहासिक आंबागड किल्ला सातपुडा पर्वताच्या कुशीत अंतीम घटका मोजत होता. पर्यटक व लोकांच्या नजरेपासून दूर होता. मात्र याबाबात पर्यटन प्रेमी मो.सईद शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी खेचून आणला. परिणामी आजघडीला या कियाचे स्वरूप पालटले असून पर्यटकांना हा किल्ला आपल्याकडे आकर्षित करीत आहे.या उपेक्षित किल्ल्याचे उध्दार, जतन व संरक्षण व्हावे म्हणून इतिहास व पर्यटन क्षेत्रात काम करणारे मो.सईद शेख यांनी सन १९८० पासून १५ ते २० वर्षापर्यंत सतत पत्र व्यवहार करुन शासन दरबारी पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांना येथे अनेकदा पाचारण केले. माजी प्रधानमंत्री नरसिंहराव व राज्याचे मुख्यमंत्र्याना या किल्ल्याबाबद पत्राद्वारे कळविले असता पत्राची दखल घेवून पुरातत्व विभागाला याबाबद पत्र देण्यात आले होते.अखेर पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये किल्ल्याचा समावेश करुन २ कोटी ३३ लाख रु. मंजूर करण्यात आले व कामास सुरवात झाली.गडावर चढण्यासाठी पायºया नव्हत्या, पुर्वी पर्यटक झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने कसेबसे वर पोहोचत असत. प्रथम पायºया बनविण्यात आल्या. नंतर भव्य प्रवेशद्वार, बुरुज, परकोट भिंत (जे पूर्ण ढासळलेले होते) नगारखाना, मनोरे व अनेक भागाचे जिर्णोद्धार व निर्माण पेंटीगची कामे करण्यात आली आहेत. काही ईमारती भुईसपाट झाल्या असून त्याचे जिर्णोद्धार पण दुसºया टप्प्यात करण्यात येणार आहे. कामे खुप मोठी व जिकरीचे असून याला काही वेळ लागेल. किल्ल्याचे निर्माते राजे बख्तबुलंद शाह यांचे नागपूर येथील वारस राजे विरेंद्रशाह बख्तबुलंद शाह यांना सन २००२ (डिसेंबर) मध्ये नागपूर त्रिशताब्दी महोत्सवाप्रसंगी किल्ल्यावर बोलावून त्यांचे वारसदारांनी हे किल्ले बांधल्याचे माहिती शेख यांनी दिली होती. त्याप्रसंगी त्यांनी राजवैभवाच्या त्रिशाब्दीचा ध्वज पण फडकावून किल्ल्याला सन्मान दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचे येथे आगमण झाले. आता किल्याचे नविन स्वरुप बघायला येणार आहेत.अनेकदा येथे महाराष्ट्र, विदर्भ, जिल्ह्यातून अनेक इतिहासकार, संशोधक, पर्यटक, शाळेच्या सहली येथे शेख यांनी आमंत्रित करुन किल्ल्याविषयी मार्गदर्शन केले आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची येथे संख्या वाढत आहे. किल्ल्यावर अनेक दर्शनिय स्थळांचे जिर्णोद्धार व निर्माण झाल्याने हा किल्ला बलदंड आणि नव्या दमाने, नविन स्वरुपात पर्यटकांच्या स्वागतास सज्ज झाला आहे.
आंबागड किल्ल्याची पर्यटकांना पडली भूरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:50 AM