लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : निसर्गाने नटलेल्या कोका अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अलीकडे धुडगूस घालण्याच्या घटनात वाढ झाली आहे. सोमवारी अशाच पर्यटकांनी व्याघ्र दर्शन झाले नाही म्हणून गोंधळ घालत एका वनमजूराला मारहाण केली. त्यावरुन वनविभागाने त्या पर्यटकांना दंड ठोठावला.भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्यात अलिकडे पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. हमखास वन्यप्राणी दर्शन होत असल्याने पर्यटक येथे येत आहेत. सोमवारी नागपूर जिल्ह्यातील पर्यटक कोका अभयारण्यात आले. अभयारण्यात काम करित असलेल्या वनमजूराला वाघाबाबत विचारणा केली त्यावर वनमजूराने उत्तर देताच तीन वाहनातून आलेले पर्यटक खाली उतरले आणि वनमजूराला मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या गाईडलाही धमकावले. याबाबीची माहिती वनमजूर व गाईडने आपल्या वरिष्ठांना दिली.वरिष्ठ अधिकाºयांनी त्याठिकाणी धाव घेत पंचनामा केला. १७ पर्यटकांकडून प्रति व्यक्ती एक हजार रुपये दंड वसूल करत माफीनाफा लिहून घेतला. यात १२ पुरुष व ५ महिला पर्यटकांचा समावेश होता. अभयारण्यात कर्मचाºयांसोबत वाद घालण्याचे प्रकार नेहमीच होतात. यासोबतच पर्यटक वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन करून कर्कश हॉर्न वाजवितात. तसेच या परिसरात असलेल्या हॉटेलमध्येही रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालत असतात. दंडात्मक कारवाईमुळे आता पर्यटक सुधारतील अशी अपेक्षा आहे.
कोका अभयारण्यात पर्यटकांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:23 PM
निसर्गाने नटलेल्या कोका अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अलीकडे धुडगूस घालण्याच्या घटनात वाढ झाली आहे. सोमवारी अशाच पर्यटकांनी व्याघ्र दर्शन झाले नाही म्हणून गोंधळ घालत एका वनमजूराला मारहाण केली. त्यावरुन वनविभागाने त्या पर्यटकांना दंड ठोठावला.
ठळक मुद्देवनमजुराला मारहाण : दंडात्मक कारवाई