लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला. दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापन कामगाराच्या डिमांड करारानुसार वेतनात वाढ करण्यासाठी करार करते. सहा महिने होऊनही करार करण्यास टाळाटाळ होत असून दिवाळी तोंडावर आल्यावरही बोनस बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. वारंवार मागणी करूनही कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सनफ्लॅग आयर्न अँड स्टील मजदूर सभेने आक्रमक पवित्रा घेतला असून वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत सध्या स्थित ५७८ स्थायी कामगार आहेत. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यात डिमांड करीत तीन वर्षांपूर्वी झालेला करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. नियमानुसार करार संपुष्टात येण्यापूर्वी संघटना आणि व्यवस्थापन यांनी कराराच्या अटी बाबत कारवाही करणे आवश्यक आहे. याबाबत संघटनेने सनफ्लॅग व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या. पण याबाबद कंपनी व्यवस्थापनाचे वेळकाढूपणा केला. वारंवार मागणी करूनही चर्चा झाली नाही. दिवाळी तोंडावर असतानाही बोनसबाबत निर्णय अजून होणे बाकी आहे. कामगार संघटना यांनी डिमांड करारासाठी पूर्वरत प्रचलित पद्धत किंवा कंपनीच्या नफ्यानुसार वेतन वाढ कारण्याची मागणी सनफ्लॅग व्यवस्थापन यांच्याकडे केली आहे. गट वर्षात सनफ्लॅग कंपनीला ६५ कोटींचा नफा झाला.सनफ्लॅग कंपनीला हा नफा कंपनीवर असलेला कर्ज फेडून झाला असल्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू भक्कम आहे. त्यामुळे कंपनीने कामगाराच्या डिमांड त्वरित मंजूर करून दिवाळी पूर्वी बोनस जाहीर करण्याची मागणी केली आहे. डिमांड व बोनस मागणीचा निर्णय लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी कामगार संघटनेने दिली आहे. यावेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय बांडेबुचे, महासचिव मिलिंद वासनिक किशोर मारवाडे, विजेंद्र नेमा, विकास फुके, अमोद डाकरे, विकास बांते, रवींद्र बोरकर, ज्ञानेश्वर वंजारी, शिवकुमार सार्वे , शैलेंद्र दुबे, सारंग व्यवहारे, प्रदीप नागपुरे, जावेद , डी एन यादव, संदेश गणवीर, प्रकाश बलभद्रे व महेश बर्वेकर उपस्थित होते.
वेतन करारासाठी कामगार संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 11:51 PM
मार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला. दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापन कामगाराच्या डिमांड करारानुसार वेतनात वाढ करण्यासाठी करार करते.
ठळक मुद्देमार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला.