लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिमार्णी (भद्रावती) : रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.स्थानिक ग्रामोद्योग संघाच्या सभागृहात आयोजित कुंभार कारागीर व मधुमक्षिका पालक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार चौधरी होते. मंचावर सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, चंद्रकांत गुंडावार, डॉ. अनिल बुजोणे, ओम मांडवकर, विजय राऊत, अशोक हजारे, प्रवीण सातपुते, नरेंद्र जीवतोडे तथा अन्य मान्यवर उपस्थित होते. कुंभार कारागीरांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी ना. अहीर यांनी दिले. यासाठी गरजुंनी भद्रावती येथील ग्रामोद्योग संघाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी पिरली येथे लवकरच शेतकरी बांधवांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पिरली येथील कोलते नामक शेतकºयाने आपण मधुमक्षिका पालनातून कशी प्रगती केली, हे भाषणात सांगितले. यावेळी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना शासकीय अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्या.यावेळी टेक महिंद्रा कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन नोकरी लागलेल्या २५ तरूण-तरूणींचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करू इच्छिणाºयांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षण घेणाºयांना मधुमक्षिका पालनाच्या पेट्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कुंभार कारागीरांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ग्रामोद्योग संघाकडे देण्यात आली आहे. प्रास्ताविक जितेंद्रकुमार, संचालन राहुल बनकर, आभार विजय श्रीवास्तव यांनी मानले. या मेळाव्यात जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकरी व कुंभार कारागीर उपस्थित होते.
रोजगारासाठी पारंपरिक कलाकौशल्यांना वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:51 PM
रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देहंसराज अहीर : भद्रावती येथे कुंभार कारागीर व मधुमक्षिका पालक मेळावा