ठाणेदार मनोहर कोरेट्टी, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, नगर पंचायतीचे करनिर्धारण अधिकारी निखिल गाडगे, कर प्रशासनिक अधिकारी राजवर्धन चव्हाण आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काढलेल्या या पथसंचलनात कोरोना प्रतिबंधात्मक जागृतीविषयक घोषणा देत जागृती करण्यात आली. दरम्यान नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर अन्य शासन निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरण सुरू केले. मात्र दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण अभियानात नागरिकांनी कोणत्याही अफवेवर लक्ष न देता लसीकरणासाठी स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन स्थानिक पोलीस, तहसील तथा नगर पंचायत प्रशासनाद्वारे करण्यात आले.
या पथसंचलनात थानेदार मनोहर कोरेटी, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे,कर व प्रशासनिक अधिकारी राजवर्धन चव्हाण, करनिर्धारण अधिकारी निखिल गाडगे आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काढलेल्या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे, पुंडलिक मस्के, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, अमरदीप खाडे, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण, मिलिंद बोरकर, नितीन बोरकर, राहुल गायधने, गोपाल कोसरे, दुर्योधन वकेकर, राजेश शेंडे, एएसआय मडावी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी तथा पोलीस होमगार्ड उपस्थित होते.
===Photopath===
100621\img-20210610-wa0012.jpg
===Caption===
कोरोना जनजागृतीसाठी पथसंचलन करतांना पोलीस अधिकारी कर्मचारी