पोलिसांवर प्रश्नचिन्ह : कारवाईची मागणी अड्याळ : अड्याळमध्ये ठिकठिकाणी सट्टा व्यवसाय, मोहफुल दारू विक्री खुलेआम सुरु आहे, असे असतानाही याविषयी तक्रार करणार कोण आणि तक्रार करून जास्तीत जास्त किती दिवस हे व्यवसाय बंद राहणार आहे, असा सवाल निर्माण झाला आहे. जुगारातील ओपन फरकाच्या खेळात बऱ्याच युवकांचे आयुष्य कर्जात आहे. सट्टा व दारूचे व्यवसाय करताना आढळतात त्या मागचे कारण काय असणार हे समजण्या पलिकडे आहे. अड्याळमध्ये सध्या जुगाराचा अड्डा नाही, परंतु तोही लवकरच येण्याची चर्चा आहे. जुगार अड्डा चालविणाऱ्याची ओळख पोलीस अधिकाऱ्यांसोबत असल्यामुळेच की काय त्यांच्यावर कारवाई होत नाही. कारवाई झाली तर त्या कारवाईचा परिणाम त्या संबंधितावर का पडत नाही हा खरा प्रश्न आहे. अवैध सावकारकी म्हणजे जसे देण्याची ताकद तेवढीच पैसे काढण्याची ताकद हे मंडळी ठेवतात. त्यामुळेच की काय एखाद्याच्या मुलाने पैसे घेतले तर त्याचे आईवडील निमुटपणे पैसे देवून मोकळे होतात. कारण एकच असते ते म्हणजे आपल्या मुलाला काही होता कामा नये, त्याने आपल्या जिवाचे बरे वाईट करू नये, एवढे असले तरी कोणतीही व्यक्ती व्याजाने पैसे देऊ शकते का, जेव्हा पैसे घ्यायची वेळ येते तेव्हा ही देणारी मंडळी घरापर्यंत जायला मागेपुढे पाहत नाही. परंतु जेव्हा पैसे दिल्या जाते तेव्हा संबंधित व्यक्तींच्या आई वडिलांना विचारून का दिल्या जात नाही. या अवैध सावकारकीमुळे एकाची वेळ भागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी अड्याळ ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
अड्याळ परिसरात अवैध धंद्याचे जाळे
By admin | Published: August 19, 2016 12:39 AM