शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

माती वाहतूक कामात गैरव्यवहार!

By admin | Published: December 04, 2015 12:58 AM

मोहाडी तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायतीचे वतीने सन २०१५ मध्ये झालेल्या पाटील तलाव खोलीकरण व गाळ

पालोरा येथील प्रकार: माहिती अधिकारातून गैरव्यहार उघडकीस, चर्चेला उधाणकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायतीचे वतीने सन २०१५ मध्ये झालेल्या पाटील तलाव खोलीकरण व गाळ वाहतुकीच्या कामात संगनमताने करण्यात आलेला घोटाळा माहिती अधिकारातून उघडकीस आलेला आहे. गाळ वाहतुकीच्या कामावर ट्रॅक्टर नसतांना कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे, त्यांचे वडील अंतीराम कुकडे तसेच रोहयो तांत्रीक अभियंता महेश निमजे यांचे लहान बंधू संजय निमजे यांचे नावे वाहतुकीचे ३८९ ट्रिपचे ६६,४८३ रुपयांची देयके संगनमताने मंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष कामावर राबलेल्या ट्रॅक्टर चालक-मालकात असंतोष असून चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.पालोरा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१५ चे मे महिन्यात पाटील तलावातील गाळाचे खोदकाम करुन ट्रॅक्टरच्या सहायाने शेतकऱ्याचे शेतात वाहतूक करण्याचे काम हाती घेण्यात आले. रोहयो कामावर अकुशल कामासाठी जवळपास ५३० मजुर कार्यरत होते. तर गावातील १४ ट्रॅक्टर प्रत्यक्ष वाहतुकीचे कामावर लावले गेले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहचवून देण्यात आला. यासाठी ट्रॅक्टर चालक-मालकांना प्रती ट्रॅक्टर (ट्रीप) १७०.९१ प्रमाणे भाडे देण्यात आले. पंरतु यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावाबाहेरील ट्रॅक्टर लावण्यात आलेले नव्हते. पाटील तलाव गट क्रमांक ११ मध्ये दोन आठवड्याचे काम झोले. पहिला आठवडा ७ ते १३ मे पर्यंत पूर्ण होऊन यामध्ये मस्टर क्रमांक ३०३८ ते ३०५७ यांचा समावेश होता. दुसऱ्या आठवड्याचे काम १४ ते २० मे दरम्यान झाले. यामध्ये मस्टर क्रमांक ३८१४, ३८३२, ३९५४ यांचा समावेश आहे. दोन्ही मस्टर दरम्यान कामावर नसतांना कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर अंतीराम कुकडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ एल १११३ च्या नावे ६५ ट्रीप, अंतीराम नागोजी कुकडे, ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी ९८५ च्या नावे ६५ ट्रीप तर रोहयो तांत्रीक अभियंता महेश निमजे यांचा लहान भाऊ संजय इस्ताक निमजे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ डी ९८९७ च्या नावे ७० ट्रिप असे एकूण २०० ट्रिपचे भाडे पहिल्या आठवड्यात दाखविले गेले. दुसऱ्या आठवड्यात दिगांबर कुकडे यांच्या नावे ६२, अंतीराम कुकडे यांचे नावे ६२ तर संजयच्या नावे ६५ ट्रिप असे एकुण १८९ ट्रिपचे भाडे दाखविण्यात आले. दोन्ही आठवड्या मिळून ३८९ ट्रिपचे १७०.९१ भाडे प्रमाणे ६६,४८३ रुपयांचे भाडे दाखविण्यात आले. सदर गैरप्रकार ग्रामपंचायत, अभियंता व रोजगार सेवक यांच्या संगणमताने करण्यात आला. (वार्ताहर)