लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाबाबत नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामस्तरावर जनजागृती करून आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे नऊशे स्वच्छाग्रहींना कॉम्प्युटर आणि मोबाईलवर झूम अॅपद्वारे प्रशिक्षीत करण्यात आले.जिल्हा परीषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छाग्रही प्रशिक्षणात सहभागी झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश बागडे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण पार पडले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे प्रशिक्षणाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्रामस्तरावर कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छाग्रहींनी योध्दे म्हणून कामे करावे, असे आवाहन केले. या प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. खेडीकर, पाणी गुणवत्ता निरीक्षक हेमंत भांडारकर, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, प्रविण खंडारे, क्षमता बांधणी तज्ज्ञ संजय धोटे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, मनुष्यबळ विकास सल्लागार बंडू हिवरे यांची उपस्थिती होती.प्रशिक्षणादरम्यान स्वछाग्रहींना कोरोनाची उपाय योजना व संसर्ग, आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून जनजागृती करणे, शारीरीक अंतर राखण्यासाठी उपायायोजना, काल्पनीक माहिती आणि गैरसमज, अधिक जोखमीचे गट आणि संभाव्य रूग्ण ओळखणे, मानसिक काळजी, मानहानी व भेदभाव, कोरोनाबाबत समज गैरसमज, सामान्य दिसून येणारे लक्षणे, समुदायामध्ये सुरक्षित सवयी, श्वसनसंस्थेची स्वच्छता, प्रसार होण्याचे मार्ग, हातांची स्वच्छता, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, फ्रंटलाईन वॉरीयरसाठी खबरदारीच्या आणि सुरक्षितेच्या उपाय योजना, प्रतिबंधात्मक उपाय कुटूंब आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिण्याचे पाणी, पाणी साठवण, हाताळणी आणि स्त्रोत स्वच्छता, शौचालयाचा वापर आणि स्वच्छता, मैल गाळ व्यवस्थापन, कोविड संभाव्य आणि बाधित व्यक्ती संबंधी काळजी या सत्रात उपाययोजना आणि प्रतिबंध व सहयोगी वातारवरणाची निर्मिती, घरच्या घरी विलगीकरण व संभाव्य बाधित व्यक्तींचे सुरक्षित वास्तव्य, संभाव्य संक्रमित व्यक्तींच्या घरातील कुटुंबियांना घ्यावयाची खबरदारी, कुटुंबस्तरावरील विलगीकरण केलेल्या घरातील टाकाऊ पदार्थ्यांची योग्य विल्हेवाट, कुटुंबियांची सुरक्षितता, प्रोत्साहन आणि स्वच्छता विषयक अपेक्षित वर्तन, मानहानी व भेदभाव, कोरोनाबाबत गैरसमज आणि संवाद उपक्रम, इतर यंत्रणेसोबत समन्वय, घ्यावयाची काळजी व जनजागृती बाबत तज्ज्ञ साधन व्यक्ती यांनी स्वच्छताग्रहींना मार्गदर्शन केले. तसेच केसस्टडीच्या माध्यमातून विश्लेषणात्मक माहिती दिली.कॉम्प्युटर आणि मोबाईलवर झूम अॅपद्वारे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात भंडारा जिल्ह्यातील सुमारे ९०० स्वछाग्रहींनी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापूरे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, निखील वंजारी व तालुकास्तरीय गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कोरोना जनजागृतीसह संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:00 AM
जिल्हा परीषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छाग्रही प्रशिक्षणात सहभागी झाले.
ठळक मुद्देजिल्हा परिषदचा पुढाकार : नऊशे स्वच्छाग्रही झूम अॅपद्वारे झाले सहभागी