लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाहतूक कोंढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर आडवे होवून तासभर वाहतूक रोखून धरल्याची घटना येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी मार्गावरील साई मंदिर परिसरात घडली. गत महिनाभरापासून वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे.शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या मार्गाचे खोदकाम केल्यानंतर काम बंद झाले. परिणामी एकेरी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्यातच दोन दिवसापासून या रस्त्यावर तात्पुरते काम सुरू झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या वाहनांची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही एसटी बसेससह ट्रक आणि इतर वाहने याच रस्त्यावरून धावत होती. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंढी झाली होती. त्यातच या परिसरात लग्न असल्याने गोंधळात आणखी भर पडली. हा प्रकार युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश थोटे यांच्या लक्षात आला. त्यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास या परिसरातील नागरिकांसोबत त्यांनी रस्ता अडवून धरला. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरून केवळ लहान वाहनांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिक करीत होते. विशेष म्हणजे मानव विकास मिशनची बस या नागरिकांनी अडवून तिला चक्क परत पाठविले. ही बस भंडारा तालुक्यासाठी नसतानाही वरठी येथील सनफ्लॅगसाठी एकेरी मार्गातून जात होती. अखेर पोलिसांनी याठिकाणी धाव घेवून मध्यस्ती केली आणि वाहतूक सुरळीत झाली. मात्र नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.जड वाहतुकीवर बंदी आणाबांधकाम सुरू असलेला जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्यावरून काही काळासाठी मोठ्या चार चाकी वाहनांना बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद चौकात नो एन्ट्रीचा फलक लावल्यानंतरही अवजड वाहने या मार्गाने धावतात.
वाहतूककोंडीने त्रस्त नागरिकांनी अडविली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:53 PM
वाहतूक कोंढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर आडवे होवून तासभर वाहतूक रोखून धरल्याची घटना येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी मार्गावरील साई मंदिर परिसरात घडली. गत महिनाभरापासून वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे.
ठळक मुद्देनागरिकांचा संताप : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्त्यावरील प्रकार