भंडारा : कोरोना संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने ट्रॅव्हल्स व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. मात्र, श्रावण महिन्यातील सणवार उत्सव सुरू होताच आता ऐन गणेशोत्सवात ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढ केली आहे. दुसरीकडे एसटीचे तिकीट दर मात्र तेवढेच आहेत. मात्र, खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढ केल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांना वाढलेल्या तिकिटाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. थेट भंडारा शहरातून पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, नाशिक, मुंबईसाठी ट्रॅव्हल्स धावत नसल्या तरी नागपूरवरून सर्व ट्रॅव्हल्स धावतात. यात सर्वाधिक सोलापूर, औरंगाबाद, पुणे मार्गावरील ट्रॅव्हल्सचे तिकीट वाढले आहे. सोलापूर नागपूरसाठी सुरुवातीला आठशे रुपये तिकीट होते. मात्र, आता चक्क १०५० रुपये तिकीट आकारले जात आहे. तीच अवस्था पुणे, औरंगाबाद, नाशिक, रायपूर शहरांसाठीही केली आहे.
बॉक्स
या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स
नागपूर - औरंगाबाद
नागपूर -पुणे
नागपूर -मुंबई
नागपूर -सोलापूर
प्रवाशांना फटका
मी कमी वेळात व आरामदायी प्रवास म्हणून गेल्या दहा वर्षांपासून ट्रॅव्हल्सने प्रवास करत आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळातच ट्रॅव्हल्सचालक प्रवाशांची लूट करतात. यावर सरकारचे नियंत्रण हवे.
प्रवीण दराडे, प्रवासी
कोट
मी नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर राहत असल्याने गावी जाण्यासाठी ट्रॅव्हल्सशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, दिवाळी-दसरा गणपतीच्या काळात ट्रॅव्हल्स व्यावसायिक अधिकचे दर आकारून प्रवाशांची लूट करत आहेत.
अनिल मुंडे, प्रवासी
बॉक्स
दोन वर्षांनंतर बरे दिवस
कोट
कोरोनामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला होता. याचा सर्वाधिक फटका ट्रॅव्हल्स चालकांना बसला. त्यातच कोरोना वाढल्यानंतर प्रवासी वाहतूकही मंदावली होती. आता कुठे हळूहळू ट्रॅव्हल्स व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. मात्र, डिझेलची भाववाढ झाल्याने आम्हाला तिकीट दरात वाढ करावी लागली.
ट्रॅव्हल्स चालक
कोट
आज प्रत्येक गोष्टीत महागाई वाढली आहे. डिझेल, चालक, वाहकाचा पगार तसेच इतर कामगारांसह ऑफिसचा खर्च चालविणे ट्रॅव्हल्स चालकांना कठीण होत आहे. तिकीट दरात वाढ झाली असली तरीही ट्रॅव्हल्स व्यावसायिक आजही अडचणीतच आहेत.
-ट्रॅव्हल्स चालक