शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

दीड वर्षाच्या काळात सात बीडीओंचा प्रवास

By admin | Published: January 31, 2017 1:20 AM

या पंचायत समितीच्या कारभाराला प्रभारी कार्यभाराची लागण झाली आहे. याना त्या कारणावरून कार्यभार

आज रूजू झाले नियमित बीडीओ : शेवटचे कृष्णा मोरे दीड वर्षासाठीच मोहाडी : या पंचायत समितीच्या कारभाराला प्रभारी कार्यभाराची लागण झाली आहे. याना त्या कारणावरून कार्यभार काढला जातो, दिला जातो. त्यामुळे मागील दीड वर्षात सात अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी म्हणून मोहाडी पंचायत समितीत प्रवास केला आहे. मोहाडभ पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवर चालत होती. सप्टेंबर २०१५ ला पंकज भोयर यांची भेट नियुक्ती गटविकास अधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यांची ती प्रथम नियुक्तीची सुरूवात मोहाडी पंचायत समितीमधून कायम गटविकास अधिकारी म्हणून झाली होती. थेट नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या कामाचा अंदाज वेगळा होता. काही नेत्यांना त्यांचा कारभार पसंत पडला नाही. नंतर पंकज भोयर यांना फटाके लावण्यात आले. अखेर त्यांची बदली करूनच राजकारणी नेते स्वस्थ बसले. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी गजानन लांजेवार यांना २६ मे रोजी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आला. पाच महिन्यानंतर गजानन लांजेवार अर्जित रजेवर गेले. त्याचा कार्यभार प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कृषी अधिकारी रविंद्र वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आले. वीस दिवस गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे रविंद्र वंजारी यांनी परत आपल्या मुळ आस्थावनेवर गेले व त्यांच्या जागी पुन्हा प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून गजानन लांजेवार रूजू झाले. तथापि, पुन्हा गटविकास अधिकारी पदावर रूजू झालेले गजानन लांजेवार यांना केवळ तेरा दिवसच त्या खुर्चीवर ठेवण्यात आले. जाणिवपूर्वक गजानन लांजेवार यांना प्रभारी गटविकास अधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचा कारभार मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी केला होता. आदेश येण्यापूर्वीच सीटीसी भरून कार्यभार सोडण्याचा प्रकार करण्यात आला होता. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच नवीन प्रभारी गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांचा आदेश येवून धडकला होता. या भानगडीत एक आठवडा विना गटविकास अधिकाऱ्या अभावी पंचायत समिती चालविण्यात आली होती. तुमसरचे सहायक गटविकास अधिकारी असलेले मनोज हिरूडकर २६ नोव्हेंबर रोजी मोहाडी पंचायत समितीला रूजू झाले. त्यांनी २४ जानेवारीपर्यंत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यभार सांभाळला. पण, त्यांची पदोन्नती खंडविकास अधिकारी म्हणून देवरी देथील पंचायत समितीला करण्यात आली. तेही मोहाडीतून निघून गेले. त्यानंतर त्याच दिवशी भंडारा येथील एमआरईजीएसचे बीडीओ एम.ई. कोमलवार यांनी मोहाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. पण, त्यांचही दुर्देव आज ३० जानेवारी रोजी त्यांना भंडारा येथे परत जावे लागले. गडचिरोली येथून प्रकल्प सहायक पदावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत काम करणारे कृष्णा मोरे यांना बढती मिळाली. येथील पंचायत समितीमध्ये नियमित गटविकास अधिकारी म्हणून कृष्णा मोरे यांनी कार्यभार स्विकारला आहे. दीड वर्षानंतर मोहाडी पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाला आहे. तथापि, ते पुढील दीड वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा दीड वर्षानंतर प्रभारी अधिकारी पदाची टांगती तलवार मोहाडी पंचायत समितीवर राहणार आहे. सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा जावा यासाठी ते काही दिवस सुटीत काढतील. पुन्हा तेच प्रभारी अधिकाऱ्यांचा कार्यभार बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)