वृक्षदिंडीचे आयोजन : अरविंद विद्यालय बघेडाचा उपक्रमपवनारा : तुमसर तालुक्यातील खासदार दत्तक गाव बघेडा येथील अरविंद विद्यालय येथे वृक्ष दिंडीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, वनकर्मचारी, ग्रामस्थ हजर होते.शनिवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास अरविंद विद्यालयातून वृक्षदिंडी गावच्या मुख्य मार्गाने जात असताना विद्यार्थी लाऊडस्पीकरच्या जल्लोशात झाडे लावा, झाडे जगवा, करा वृक्षांचे संवर्धन करू या पर्यावरणाचे रक्षण. अशा घोषणा देत नागरिकांना वृक्ष लागवडीचे व वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून दिले व सर्वांनी एक झाड लावून संगोपन करा असा आग्रह सुद्धा करण्यात आले. दिंडीला गावकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून येत्या १ जुलैला वृक्ष लागवड यशस्वी करायची आहे. याबाबत शपथविधी घेण्यात आली.राजेंद्र कडव मुख्याध्यापक अ.वि.बघेडा व एम.एल. माकडे वन परिक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी यांनी शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांना वृक्ष लागवड कशी महत्वाची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एम.टी. गौरे शिक्षिका, पी.आर. तितीरमारे, एम.बी. चौधरी, एस.आर. मलेवार, एस.एस. गौपाले, आर.आर. पशिने, एल.डी. लांडगे इ. शिक्षक हजर होते. त्याचप्रमाणे आर.आर. परतेती (क्षेत्र सा.बघेडा), एन.जी. श्रीरामे, ए.डी. मेश्राम, जे.डी. हटवार बीटरक्षक व हेमराज सिरसाम, के.बी. रहांगडाले, के.टी. पारधी वनमजूर, वसंत तरटे सरपंच, प्रकाश दुर्गे आदर्श शेतकरी, नामदेव चौधरी व ग्रामस्थ हजर होते. (वार्ताहर)
वृक्ष लागवड जनजागृती मोहीम
By admin | Published: June 27, 2016 12:43 AM