शहापूर : येथील हनुमान मंदिर बाजार टोली येथे सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळातर्फे बालउद्यान व स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोविड १९च्या काळात समाजात आपले कर्तव्य बजावून समाजाची खऱ्या अर्थाने सेवा केली त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बैसाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीएसएचे सचिव नरेंद्र पालांदूरकर, डॉ. ऋदया निमजे, माजी सरपंच अरुण कारेमोरे, पोलीस पाटील धम्मपाल सुखदेवे, उपसरपंच किरण भुरे, ग्रामपंचायत सदस्य तेजेंद्र अमृतकर, अलका पाटील आणि श्रावण मुळे आणि राजभोज भुरे उपस्थित होते.
सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा विविध सामाजिक कार्यक्रम घेतले. यात मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ. अमित ढोमने, नेत्र सहायक प्रणय ढोमने यांनी ८० लोकांची नेत्र तपासणी केली.
यावेळी सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळातर्फे कोविड योद्ध्यांना चषक व सन्मानपत्र देऊन पंकज बैसाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच शहापूर येथील अंगणवाडी सेविका लहानाबाई राजूरकर, आशा वर्कर उषा मेश्राम व ग्रामपंचायत सफाई कामगार यांचा चषक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष नाना भुरे, श्रीकांत हरडे, हेमंत बागडे, समीर भजनकर, विश्वजित सोनवणे, अनुप भुरे, धीरज फुलबांधे, रोहित लोखंडे, शुभम भुरे, भुदेव चामट, बालू ढोके, साहिल, प्रणय, रोशन, अमित, निखिल, दशरथ, बालू यांनी सहकार्य केले.