पवन मस्के : सुरेवाडा येथे वृक्षारोपण
भंडारा : सुरेवाडा येथे स्मृतिवनात स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतिदिनानिमित्त झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श युवा मंच अध्यक्ष पवन मस्के, वनविभाग अधिकारी आर.टी. मेश्राम, युवक बिरादरी भंडाराच्या संस्थापक वर्षा दाढी, सरपंच माधुरी राघोर्ते, पोलीस पाटील मंगला राघोर्ते, सदस्य योगेश राघोर्ते, महेश हजारे, अशोक खोब्रागडे, युवक बिरादरीचे विक्रम फडके, वैभव कोलते, प्रिया कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
आदर्श युवा मंच अध्यक्ष पवन मस्के यांनी प्रत्येकाने कोरोना या संसर्गजन्य आजाराने दगावलेल्या व्यक्तीच्या आठवणीत एक झाड लावावे व युवक बिरादरीच्या उत्कृष्ट कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यावेळी सरपंच माधुरी राघोर्ते यांनी स्मृतिवन युवक बिरादरी सुरेवाडा वृक्ष प्रत्येकाने लावावा व वनाच्या जागेवर संरक्षक भिंत, वृक्षांना कटघरे व लाइट ग्रामपंचायतीच्या वतीने लावून देण्याचे आश्वासन दिले.
तर, वनविभागाचे अधिकारी आर.टी. मेश्राम यांनी नियमित वृक्ष गावकऱ्यांनी लावावे व वृक्ष जगवावे, असे सांगितले.
तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. संचालन खुशी पैगवार व सुरेंद्र कुलरकर यांनी केले. प्रास्ताविक वर्षा दाढी यांनी केले. त्यात युवकांनी सदर उपक्रम नियमित सुरू ठेवण्यास आवाहन केले आहे. उपस्थित मान्यवरांचे आभार उमेश साखरवाडे यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता अश्विनी शंभरकर, बबली येळणे, पलक पैगवार, प्रणीत उके, राजा पवनकर, हर्षल डहरे, विष्णू हजारे, राजेंद्र पवनकर, नितेश हजारे, कार्तिक भुते, मधुर राघोर्ते, दीपक भेदे, आशिष पवनकर, विपिन राघोर्ते, किशोर भगत, रोहित शाहर्रे, हर्षल वहिले, संदेश जमजारे, मयूर राघोर्ते, विक्की गिराडकर, भूषण मसूरकर, चेतन राघोर्ते तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.