शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

कलावंतांना आश्रय देणारी झाडीपट्टी रंगभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:06 PM

मराठी रंगभूमीने मुंबई-पुण्यापलिकडे होणाऱ्या वेगळ्या प्रयोगाची फारसी दखल घेतली नाही तरी हे प्रयोग इतके प्रामाणिक होते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मराठी रंगभूमीला शक्य नाही. यात सगळ्यात पहिले नाव विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भुभागाची ओळख झाडीपट्टी रंगभूमी आहे. १५० वर्षाची परंपरा असलेल्या या परिसरात वर्षाला तीन हजारावर नाट्यप्रयोग होतात. पुण्या-मुंबईच्या लोक कलावंताना आश्रय देणारी श्रीमंत झाडीपट्टीची रंगभूमी होय.

ठळक मुद्देपुणे-मुंबईचे कलावंत : दरवर्षी होतात तीन हजार नाटकांचे प्रयोग

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मराठी रंगभूमीने मुंबई-पुण्यापलिकडे होणाऱ्या वेगळ्या प्रयोगाची फारसी दखल घेतली नाही तरी हे प्रयोग इतके प्रामाणिक होते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मराठी रंगभूमीला शक्य नाही. यात सगळ्यात पहिले नाव विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भुभागाची ओळख झाडीपट्टी रंगभूमी आहे. १५० वर्षाची परंपरा असलेल्या या परिसरात वर्षाला तीन हजारावर नाट्यप्रयोग होतात. पुण्या-मुंबईच्या लोक कलावंताना आश्रय देणारी श्रीमंत झाडीपट्टीची रंगभूमी होय.विदर्भाची शान आणि नाट्यकंपन्याची खाण म्हणजे झाडीपट्टीची रंगभूमी होय. याची सुरुवात लोककलांच्यामाध्यमातून झाली. पूर्वी गावागावांत दंडार, गोंधळ, अशा लोककला सादर व्हायच्या याची सुधारित आवृत्ती म्हणजे संगीत रंगभूमी होय. झाडीपट्टीचे ख्यातनाम नाट्यलेखक, दिग्दर्शक सदानंद बोरकर यांनी या रंगभूमीचा इतिहास मांडला. गावागावांत शंकरपट व्हायचे त्यानिमित्ताने नाटक हा लोकांचा आवडीचा विषय. शंकरपट आणि नाटक हे समीकरण आजही कायम आहे. झाडीपट्टीचे लोक कला व नाटकावर अतोनात प्रेम करतात. शेतकरी शेतमजूर नाटकासाठी जीव की प्राण ओवाळून टाकतात. साधारणत: ६०- ७० वर्षांपूर्वी गावागावांत नाट्यमंडळी होती. त्यांना गावातील मालगुजारांचा आश्रय असायचा. दिवसभर काम करुन आलेल्या श्रमाचा परिहार करण्यासाठी नाटके बसविली जायची. यादरम्यान बाहेरचे वाद्य कलावंत, गायक, पेंटर असे कलावंत गावात आणायचे. संगित स्वयंवर, सौभद्र, मत्स्यगंधा, एकच प्याला, कानोपात्रा अशी बहुतेक नाटक यशस्वीपणे सादर केली.पुढे या नाटकांना व्यवसायीक रुप आले. नाटक करणाºया संस्था निर्माण झाल्या आणि याच संस्थांच्या माध्यमातून नाटक सादर होवू लागले. नाट्य संस्थाच्या नाटकांनीही झाडीपट्टीच समृध्दी वाढविली. विविध गावात नाट्यसंस्था उभ्या राहिल्या. देसाईगंज (वडसा) हे झाडीपट्टी रंगभूमीचे मुख्य केंद्र झाले आहे. केवळ देसाईगंज मध्ये ६० ते ७० नाट्य संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक कंपन्यांचे गावागावांत ७० ते ८० नाट्य प्रयोग होतात. यानुसार या कालावधीत ३ हजारांचा वर प्रयोग सादर केले जातात. शेतीचा हंगाम संपला की नाटकाचां हंगाम सुरु होतो. मराठी चित्रपट व मालिकांमधील पुण्या-मुंबईच्या कलावंताचा सहभाग वाढू लागला. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीनुसार नाटकादरम्यान हंगामा नावाने कार्यक्रम होऊ लागले. या रंगभूमीद्वारे ५० कोटींचावर उलाढाल होत आहे.कलावंतांना मिळाली ओळखझाडीपट्टीच्या रंगभूमीवर आपली कला सादर करणाºया अनेकांना महानगरात ओळख मिळाली. त्यात सदानंद बोरकर, अनिरुध्द वनकर, संजयकुमार, के. आत्माराम, डॉ. परशुराम, खुणे, हिरालाल पेंटर, प्रल्हाद मेश्राम, कमलाकर बोरकर, युवराज प्रधान, शेखर परके, किरपाल सयाम, राजा चिटणीस, ज्ञानेश्वरी कापगते, रागीनी बिडकर, भुमाला कुंभरे आणि असंख्य प्रतिभावंत नाट्य कलावंतांनी आपली सेवा दिली आहे.पुणे-मुंबईच्या कलावंतांना भुरळझाडीपट्टी रंगभूमीचे केवळ स्थानिक कलावंतानाच नाही तर पुणे, मुंबईच्या चित्रपट सृष्टीतील कलावंताना भुरळ पाडली. लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकरांपासून मोहन जोशी, समीर दंडारे, अभिजीत काकडे व आताचा मकरंद अनाजपुरे यांनीही या रंगभूमीवर आपली कला सादर केली. ज्युनिअर दादा कोंडके, ज्युनिअर नाना पाटेकर यांचा या कालावधीत झाडीपट्टीत मुक्काम असायचा.