शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

आदिवासी बांधवांचा कुणी वालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:43 AM

बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून बेदखल : आता माघार नाहीच कमकासूरवासीयांचा इशारा

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण आदिवासी बांधवांनी आपल्या गावातून दोन दिवसापुर्वी पलायन केले. परंतू एकही लोकप्रतिनिधी, अधिकाºयाने भेटही दिली नाही. त्यामुळे या आदिवासी बांधवांचा कुणी वाली आहे किवा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.बावनथडी प्रकल्पबाधित कमकासूर येथील आदिवासी बांधवांना गाळभरणीच्या वेळेस गाव रिकामे करण्यासाठी प्रशासनाने आदिवासी बांधवांवर सक्ती केली होती. त्यामुळे ते भूमिहीन झाले. मात्र पुनर्वसनादरम्यान शेतीवर सोडा साध्या मुलभूत गरजा पुरविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी उपजिविकेचे साधन हिरावल्याल्याने बेरोजगारांची फौज निर्माण झाली. परिणामी उपासमारीचे संकट ओढवले. असे असताना प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही जाग आली नाही. त्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आता मरण आले तरी स्वगाव सोडायचे नाही, असा निर्धार करून ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावावरून मुळगावी लेकराबाळासह पलायन केले आहे. त्याठिकाणी वीजेची व्यवस्था नाही. संपूर्ण घरे पडलेले आहे. त्याठिकाणी गवत व पाणी साचलेले आहेत. घनदाट अरण्य असून तिथे रानटी प्राण्यांचा हैदोस आहे. अशा परिस्थितीतही आदिवासी बांधव लेकरबाळ व शेळ्या मेंढ्यासह टेंट उभारून दोन दिवसापासून भयग्रस्त वातावरणात जगत आहेत. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला गरज नसल्यामुळे त्यांच्याकडून साधी विचारपुस करण्यात आली नाही.निवडणुकीचे चिन्ह वाटप असल्यामुळे दुसºया दिवसी कमकासूर येथे भेट देऊन आलो. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी उपजिल्हाधिकारी दांडगे यांना आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात पाठविले. या बैठकीमध्ये सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.- गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.आमच्या समस्येचे वास्तविक पाहण्याकरिता अधिकाºयांनी आमच्या मुळ गावी येऊनच चर्चा करावी. आम्ही कुठेही जाणार नाही.-किशोर उईके, सरपंच कमकासूर