पालांदूर : आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरभक्ती होय. भागवत ग्रंथातही आई-वडिलांच्या सेवेला मोठे स्थान आहे. कुटुंबात आत्मियता, प्रेम, सुख, समाधानासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खंडाईत यांनी केले.
लाखनी तालुक्यातील गोंदी देवरी येथे आयोजित भागवत सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बिसने महाराज, तुळशीराम ठाकरे महाराज, रामभाऊ बागबरले महाराज, भागवत समिती अध्यक्ष तुकाराम हेमने, बालाराम गिरेपुंजे, रामचंद्र खांमकुरे, मंगेश गिरी, राजू शहारे, अशोक खानकुरे, युवराज शहारे, सरपंच पोर्णिमा हमने, उपसरपंच सर्मिंदा गिरी, रीना खानकुरे, भुदेव किंदरले, निखिल शहारे उपस्थित होते. लाखनी तालुक्यातील पालांदूरजवळील गोंदी येथे सात दिवस हरिनामाचा गजर करण्यात आला. हनुमान देवस्थानाचे सदस्य तथा गावकरी मंडळींनी अत्यंत उत्साही वातावरणात भागवत सप्ताह पार पाडला.